अकोला - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गर्दी करू नये यासाठी विविध आदेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पानटपरी चालक तसेच थुंकणाऱ्यासाठी आदेश दिले. मात्र, या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी विविध पानटपरीचालकांवर कारवाई केली. आज (शनिवारी) ही कारवाई करण्यात आली. तसेच यावेळी पानटपरीचालकांसोबत त्यांचा वादही झाला, तर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
कोरोना विषाणूचा संसर्ग हा थुंकण्याने मोठ्या प्रमाणात होत असल्याने थुंकणाऱ्यावर कारवाई करणे, पान टपरी चालकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. त्यानुसार या आदेशाचे उल्लंघन अनेक पानटपरी चालक करीत आहेत. त्यामुळे अशा पानटपरी चालकांवर निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी आज (शनिवारी) कारवाई केली. या कारवाईमध्ये अनेक पानटपरी चालकांचा त्यांच्यासोबत वादही झाला. यावेळी पानटपरी चालकांकडून दोनशे रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.
हेही वाचा - अफवांना बाजुला सारा; कोरोनासंबंधी अचूक माहितीसाठी WHOच्या या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा
यानंतर जर त्यांनी पुन्हा पानटपरी सुरू ठेवली तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिला. दरम्यान, शुक्रवारी तहसीलदार विजय लोखंडे यांनीही पानटपरी चालकांवर कारवाई केली होती.