ETV Bharat / state

किसान सभा काढणार २० हजार शेतकऱ्यांचा वाहन मोर्चा

नवे कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने नाशिक ते मुंबई वाहनमार्च काढला जाणार आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करणार करणार आहे.

vehicle-morcha-of-twenty-thousand-farmers-held-by-kisan-sabha
किसान सभा काढणार २० हजार शेतकऱ्यांचा वाहन मोर्चा
author img

By

Published : Jan 22, 2021, 7:52 PM IST

नाशिक - केंद्र सरकारने केलेले शेतकरीविरोधी नवे कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने नाशिक ते मुंबई वाहन माेर्चा काढला जाणार आहे. शनिवारी हुतात्मा अनंत कान्हैरे मैदानातून २० हजार शेतकरी वाहने घेऊन मुंबईकडे कूच करणार आहे.

राज्यपालांना देणार मागण्यांचे निवेदन -

देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजभवनांवर आंदोलन करण्यात येणार आहे. त्याकरिता किसान सभेचा हा वाहनमार्च मुंबई येथील आझाद मैदान येथे रविवारी पोहोचेल. सोमवारी सकाळी ११ वाजता आझाद मैदान येथे सभा होणार आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, डावे व लोकशाही पक्ष यांच्या प्रमुख नेत्यांसोबत अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस आणि दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख नेते माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करतील. त्यानंतर हा वाहन मोर्चा राज भवनाच्या दिशेने रवाना होणार आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करणार असल्याची माहिती डॉ. अशोक ढवळे यांनी दिली.

यांचा असेल सहभाग -

या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डी.वाय.एफ.आय. ही युवक संघटना व एस.एफ.आय. ही विद्यार्थी संघटना महाराष्ट्रभरातील हजारो शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

या आहेत प्रमुख मागण्या -

शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगारविरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहेत.

हेही वाचा - चर्चेची अकरावी फेरी : बैठकीत तोडगा नाही; प्रजासत्ताक दिनी दिल्लीत 'ट्रॅक्टर रॅली'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.