ETV Bharat / state

अकोल्यात काँग्रेसला मागे टाकत वंचित आघाडीने मारली बाजी, प्रकाश आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर - काँग्रेस

२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल हे दुसऱ्या क्रमांकावर होते, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी मात्र मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना पसंती न देता वंचित बहुजन आघाडीचे नेते आंबेडकर यांना पसंती देऊन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचवले आहे.

author img

By

Published : May 24, 2019, 7:02 PM IST

अकोला - गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने सर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसपेक्षा जास्त मतांची आघाडी यावेळी घेतली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत काँग्रेसला वंचित बहुजन आघाडी टक्कर देईल, असा कयास राजकीय विश्लेषकांनी लावला आहे. मात्र, या निवडणुकीत या मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला, हे नक्की.

गेल्या २०१४ च्या निवडणुकीमध्ये संजय धोत्रे यांना ४ लाख ५६ हजार ४७० मते मिळाली होती. काँग्रेसचे विधायक पटेल यांना २ लाख ५३ हजार ३५६ आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ३८ हजार ७७६ मते मिळाली होती. यावर्षी मात्र वेगळे चित्र पहायला मिळाले.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये संजय धोत्रे यांना ५ लाख ५४ हजार ४४४ मते मिळाली. तर काँग्रेसचे हिदायत पटेल यांना २ लाख ५४ हजार ३७० आणि वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ७८ हजार ८४८ मते मिळाली आहेत. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल हे दुसऱ्या क्रमांकावर होते, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी मात्र मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना पसंती न देता वंचित बहुजन आघाडीचे नेते आंबेडकर यांना पसंती देऊन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचवले आहे.

काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांच्या विरोधात मुस्लिम समाज, काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी तसेच काँग्रेसचे खिळखिळे संघटन आणि एकमेकांमध्ये नसलेला ताळमेळ या कारणाने काँग्रेसचा प्रचारात फक्त देखावाच दिसून आला, तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराची धुरा अंजली आंबेडकर यांच्या हातात होती. त्यांनी कमी वेळामध्ये सर्व पाचही विधानसभा मतदारसंघात जाऊन अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी मते मिळवण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम केले. अनेक कार्यकर्ते त्यांच्या एका हाकेवर आघाडीच्या प्रचारासाठी सरसावले. त्यामुळे विधानसभानिहाय आघाडीचा वाढलेला मतांच्या टक्क्यांचे श्रेय द्यायचे असले तर ते अंजली आंबेडकर यांना देता येणार आहे. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली मतांची आघाडी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे विधानसभेत काँग्रेस वंचीत बहूजन आघाडीसोबत आघाडी करण्यावर शिक्कामोर्तब करू शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही.

२०१४ मध्ये वंचित बहुजन आघाडीला अकोट विधानसभा मतदार संघात ३६ हजार १५९, बाळापूर ५४ हजार ४९७, अकोला पूर्व १६ हजार ८६९, अकोला पश्चिम ५२ हजार ६३०, मूर्तिजापूर ४८ हजार ३८ आणि रिसोड विधानसभा मतदार संघात ३० ४७६ मते मिळाली होती. २०१९ मध्ये विधानसभानिहाय अकोट ३९ हजार १७७, बाळापूर ५६ हजार ९८१, अकोला पूर्व २३ हजार ७४१, अकोला पश्चिम ६१ हजार ७१२, मूर्तिजापूर ५२ हजार २३०, रिसोड विधानसभा मतदार संघात ४४ हजार ४०० मते मिळाली आहेत.

काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना २०१४ मध्ये अकोट ४५ हजार ५६०, बाळापूर ४३ हजार २१४, अकोला पूर्व ५७ हजार ३८०, अकोला पश्चिम २० हजार ७५२, मूर्तिजापूर ३५ हजार २४४, रिसोड मतदार संघात ५० हजार ९०५ मते मिळाली होती, तर २०१९ मध्ये अकोट ४४ हजार ४९५, बाळापूर ८० हजार ४८८, अकोला पूर्व ६३ हजार ६३८, अकोला पश्चिम २० हजार ८६७, मूर्तिजापूर ३७ हजार ४५०, रिसोड विधानसभा मतदार संघात ३९ हजार ५८३ मते मिळाली.

Intro:अकोला - 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापेक्षा या निकालात वंचित बहुजन आघाडीने सर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसपेक्षा जास्त मतांची आघाडी यावेळी घेतली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत काँग्रेसला वंचित बहुजन आघाडी टक्कर देईल, असा कयास राजकीय विश्लेषकांनी लावला आहे. तर या मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला, हे यावरून दिसून येतो.

Body:2014 च्या निवडणुकीमध्ये संजय धोत्रे यांना 4 लाख 56 हजार 470 मते मिळाली होती. तर काँग्रेसचे विधायक पटेल यांना दोन लाख 53 हजार 356 आणि भारिप-बमसंचे तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते एड. प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख 38 हजार 776 मते मिळाली होती. यावर्षी मात्र चित्र वेगळे पहावयास मिळाले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये संजय धोत्रे यांना पाच लाख 54 हजार 444 मते मिळाली. तर काँग्रेसचे हिदायत पटेल यांना 2 लाख 54 हजार तीनशे सत्तर आणि वंचित बहुजन आघाडीचे एड. प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख 78 हजार 848 मते मिळाली आहे. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल हे दुसऱ्या क्रमांकावर होते. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते आंबेडकर तिसरा क्रमांकावर होते. यावेळी मात्र मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना पसंती न देता वंचित बहुजन आघाडीचे नेते आंबेडकर यांना पसंती देऊन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचविले आहे.
काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांच्या विरोधात मुस्लिम समाज, कॉंग्रेसमधील नेते व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी तसेच काँग्रेसचे खिळखिळे संघटन आणि एकमेकांमध्ये नसलेला ताळमेळ या कारणाने काँग्रेसचा प्रचार फक्त देखावाच दिसून आला. तर वंचित बहुजन आघाडी च्या प्रचाराची धुरा प्रा. अंजली आंबेडकर यांच्या हातात होती. त्यांनी कमी वेळामध्ये सर्व पाचही विधानसभा मतदारसंघात जाऊन एड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी मते मिळविण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम केले. अनेक कार्यकर्ते त्यांच्या एका हाकेवर आघाडीच्या प्रचारासाठी सरसावले. त्यामुळे विधानसभानिहाय आघाडीचा वाढलेला मतांच्या टक्क्यांचे श्रेय द्यायचे असले तर ते अंजली आंबेडकर यांना देता येणार आहे. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली मतांची आघाडी ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे. लोकसभेत जरी नसली तरी विधानसभेत काँग्रेस वंचित बहूजन आघाडीसोबत आघाडी करन्याबाबत शिक्कामोर्तब करू शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही.
2014 मध्ये वंचित बहुजन आघाडीला अकोट विधानसभा मतदार संघात 36,159, बाळापूर 54,497, अकोला पूर्व 16,869, अकोला पश्चिम 52,630, मूर्तिजापूर 48,038 आणि रिसोड विधानसभा मतदार संघात 30,476 मते मिळाली होती. 2019 मधील विधानसभा निहाय अशी - अकोट 39,177, बाळापूर 56,981, अकोला पूर्व 23,741, अकोला पश्चिम 61,712, मूर्तिजापूर 52,230, रिसोड विधानसभा मतदार संघात 44,400 मते मिळाली आहेत.
काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना 2014 मध्ये विधानसभा मतदार संघानिहाय मिळालेली मते अशी - अकोट 45,560, बाळापूर 43,214, अकोला पूर्व 57,380, अकोला पश्चिम 20,752, मूर्तिजापूर 35,244, रिसोड मतदार संघात 50,905 मते मिळाली. तर 2019 मध्ये मिळालेली मते अशी - अकोट 44,495, बाळापूर 80,488, अकोला पूर्व 63,638, अकोला पश्चिम 20,867, मूर्तिजापूर 37,450, रिसोड विधानसभा मतदार संघात 39,583 मते मिळाली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.