ETV Bharat / state

यावलखेड शेत शिवारात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह - अकोला जिल्हा बातमी

यावलखेड शेत शिवारात दुपारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला असून त्या महिलेचे अंदाजे वय 20 वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

crime
गुन्हे
author img

By

Published : Mar 13, 2021, 3:12 PM IST

Updated : Mar 13, 2021, 4:41 PM IST

अकोला - यावलखेड शेत शिवारात आज (दि. 13 मार्च) दुपारी अनोळखी अंदाजे 20 वर्षीय महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

या महिलेला जिवंत जाळण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महिलेचा शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतरच पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. तसेच तिची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मृतदेहाजवळ मिळाली बॅग

मृत महिलेजवळ तिची कपड्याची बॅग मिळाली आहे. त्यामध्ये कोणतेही ओळख पत्र मिळाला नाही. मात्र, त्यामध्ये एक नोंदवही मिळाली असून त्यातील एका पानावर ''तुम्हाला आता माझ्या लग्नाची चिंता राहणार नाही. तुम्ही काळजी करु नका", असा उल्लेख असून काही इंग्रजी वाक्ये आहेत व शेवटी इंग्रजी आद्याक्षर एसएस, असे लिहिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - बच्चू कडूंनी लॉकडाऊन केला रद्द; अकोलेकरांना दिलासा

हेही वाचा - जिम प्रशिक्षकांना पंधरा हजार रुपये मानधन द्या; अकोल्यात 'वंचित'ची मागणी

Last Updated : Mar 13, 2021, 4:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.