ETV Bharat / state

Akola News  : नाल्याच्या काठावरील दगडाची भिंत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू

नाल्याच्या काठावर असलेल्या प्राचीन दगडाची भिंत कोसळून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना मूर्तिजापुर शहरात आज रविवार (दि. 22 जानेवारी)रोजी सायंकाळी घडली आहे. मरण पावलेले मजूर हे नाल्याचे बांधकाम करीत होते. दगडाची भिंत कोसळल्याने त्याखाली दबल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

नाल्याच्या काठावरील दगडाची भिंत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू

author img

By

Published : Jan 22, 2023, 9:49 PM IST

Updated : Jan 23, 2023, 8:11 AM IST

अकोला : जिल्ह्यातील मूर्तिजापुर शहरातल्या लक्कडगंज भागात एका मोठ्या नाल्याचं बांधाकाम मुर्तीजापुर नगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान, आज या नाल्याचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून यामध्ये दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. लकी लखन पचारे (वय २०), सागर नरेश सोळंखे (वय२४) असे मत्यू झालेल्या मजुरांचे नाव आहे आज सकाळपासूनच तिघांनी कामकाजाला सुरुवात केली. नाल्यात बांधकाम करत असताना अचानक काठावर असलेली दगडाची भिंत कोसळली त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे.

भिंत कोसळल्यानंतर तिघही याखाली दबले गेले त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजन गंभीर जखमी झाला आहे. घटना घडल्यानंत तत्काळ आजुबाजूच्या नागरिकांनी येथे धाव घेतली अन् तिघांनाही बाहेर काढले. त्यांच्यावर मूर्तीजापुर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी यातील दोघांना मृत घोषीत केले. तर साबिर शहा मोहब्बद शहा यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मुर्तीजापुर शहर पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देवकर तसेच इतर पोलिसांनीही घटनास्थळी भेट दिली.

भिंत इंग्रजकालीन : कोसळलेली दगडाची भिंत ही इंग्रजकालीन होती. सुमारे १३ फुटाची भिंत होती. नाल्याचे खोदकाम केल्यामुळे ही भिंत शिकस्त झाली होती. त्यामुळेच दगडाची भिंत कोसळली, असावी असा अंदाज आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतरही नगरपालिकेचे अधिकारी अनुपस्थित राहिले आहेत. रविवार असल्याने सुट्टी असे म्हणून अनुपस्थित आहेत अशी चर्चा असतानाच घटनेची गंभीरता लक्षात घेत मनपा अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा : बांधकामाला पाणी देताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

Last Updated : Jan 23, 2023, 8:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.