ETV Bharat / state

अकोल्यात व्यापाऱ्यांचा बंद अपयशी, व्यापाऱ्यांमधील फूटही उघड

author img

By

Published : Sep 26, 2020, 5:04 PM IST

पहिल्याच दिवशीचा बंद अपयशी झाल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीपासून आपली प्रतिष्ठाने सुरू केली.

अकोल्यात व्यापाऱ्यांचा बंद अपयशी
अकोल्यात व्यापाऱ्यांचा बंद अपयशी

अकोला- कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान पाच दिवस बंद पुकारला होता. पहिल्या दिवशी या बंदला नागरिकांकडून व व्यापाऱ्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, दुसऱ्या दिवसापासून व्यापाऱ्यांनी हा बंद झुगारत आपली प्रतिष्ठाने सुरू ठेवली.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

बंदबाबत व्यापाऱ्यांच्या संघटनेमध्ये फूट पडल्याची चर्चा आहे. तसेच, अनेक संघटनांनी या बंदला विरोध केला होता. तर, जिल्हा प्रशासनाने मात्र सावध भूमिका घेतली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे ८२ संघटनांना सोबत घेऊन पाच दिवसांचा बंद पुकारण्यात आला होता. त्या अनुषंगाने त्यांनी तयारीही केली होती. परंतु, पहिल्याच दिवशी अकोलेकरांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. तसेच, व्यापाऱ्यांनीही बंदला संमिश्र प्रतिसाद दिला.

पहिल्याच दिवशीचा बंद अपयशी झाल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीपासून आपली प्रतिष्ठाने सुरू केली. दरम्यान, या बंदबाबत जिल्हा प्रशासनाने सावध भूमिका घेत अकोलेकरांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. पालकमंत्र्यांनीही अशाच प्रकारची भूमिका बजावली. तरीही व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांसाठी केलेला बंद व्यापाऱ्यांनीच झुगारला. अकोलेकरांनीही बंदला प्रतिसाद दिला नाही. परिणामी, बंद अपयशी ठरला. यातून व्यापाऱ्यांमधील फूट पुन्हा दिसून आली.

हेही वाचा- अमृत योजनेची कामे पूर्ण करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॉवरवर चढून सिनेस्टाइल आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.