ETV Bharat / state

अकोल्यात आज चार कोरोना पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू; १९ निगेटिव्ह

ज्या मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्या व्यक्तीस मृतावस्थेतच मंगळवारी रुग्णालयात आणले होते. त्याचा घशातील स्त्रावाचा नमुना घेऊन तो चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.

अकोल्यात आज चार कोरोना पॉझिटीव्ह
अकोल्यात आज चार कोरोना पॉझिटीव्ह
author img

By

Published : May 1, 2020, 8:13 PM IST

अकोला - कोरोना संसर्ग तपासणीचे २३ अहवाल आज सायंकाळीपर्यंत प्राप्त झाले. त्यातील १९ अहवाल निगेटिव्ह तर चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील एका व्यक्तीस मंगळवारी (दि.२८ एप्रिल) मृतावस्थेत रुग्णालयात दाखल केले होते, त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. दरम्यान आता पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ३२ झाली असून प्रत्यक्षात १७ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

आता सद्यस्थितीत ३२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यातील चार जण मृत आहेत. ११ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १७ जण उपचार घेत आहेत. दरम्यान, ज्या मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्या व्यक्तीस मृतावस्थेतच मंगळवारी रुग्णालयात आणले होते. त्याचा घशातील स्त्रावाचा नमुना घेऊन तो चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. हा ५६ वर्षीय व्यक्ती खैर महम्मद प्लॉट या भागातील रहिवासी असून तो फळ विक्रेता होता. अन्य एक रुग्ण ७९ वर्षीय पुरुष असून तो रामदास पेठेतील टिळक पार्कजवळ राहणारा आहे. तर एक ६६ वर्षीय महिला व ३९ वर्षीय पुरुष हे दोघे या आधीच्या एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील असून ते कंवरराम सोसायटी येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली.

दरम्यान, आज अखेर बाहेरून ७२७ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ३२४ गृह अलगीकरणात व १०१ संस्थागत अलगीकरणात असे ४२५ जण अलगीकरणात आहेत. तर २४० जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर ६२ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.