अकोला - जिल्ह्यात आज (शनिवारी) सायंकाळी पाचवाजेपर्यंत एकूण 24 अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. अजूनपर्यंत 13 अहवाल प्रलंबित आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आज (शनिवारी) अखेर एकूण 537 नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 524 अहवाल आले आहेत. आज (शनिवारी) अखेर एकूण ५०८ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. तर 13 अहवाल प्रलंबित आहेत. एकूण 537 नमुन्यांपैकी प्राथमिक तपासणीचे 419, फेरतपासणीचे 81 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 37 नमुने होते. आजपर्यंत एकूण ५२४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 407 तर फेरतपासणीचे 80 आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 37 अहवाल आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या 508 आहे. आज प्राप्त झालेल्या 24 अहवालात सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण 16 कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यातील दोघे मृत झाले.
हेही वाचा - कोरोनाशी लढा: देशात रोज 'इतक्या' पीपीई कीटची होतेय निर्मिती
गुरुवारी सात जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता सात रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात 13 अहवाल प्रलंबित आहेत. त्यात 12 प्राथमिक तर 1 फेरतपासणीचा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाहेरुन आलेल्या 547 प्रवाशांपैकी 236 जण गृह अलगीकरणात तर 78 जण संस्थागत अलगीकरणात, असे एकूण 314 जण अलगीकरणात आहेत. 212 जणांची अलगीकरणाची 14 दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे. तर आज (शनिवारी) 3 जण नव्याने दाखल झाले आहेत.