ETV Bharat / state

Threaten To Not Wear Burkha In Akola : महिलेला व मुलीला बुरखा न घालण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक - अकोल्यात महिलेला धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक

कर्नाटक आणि देशातील इतर अनेक ठिकाणी हिजाब ( Hijab Controversy ) वरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. या वादात अकोल्यात एका महिलेला आणि तिच्या मुलीला बुरखा न घालण्याची धमकी ( Threaten To Not Wear Burkha In Akola ) दिल्याप्रकरणी एका पुरुषाला (60) अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

संग्रहित फोटो
author img

By

Published : Feb 20, 2022, 3:33 AM IST

Updated : Feb 20, 2022, 10:40 AM IST

अकोला - कर्नाटक आणि देशातील इतर अनेक ठिकाणी हिजाब ( Hijab Controversy ) वरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. या वादात अकोल्यात एका महिलेला आणि तिच्या मुलीला बुरखा न घालण्याची धमकी ( Threaten To Not Wear Burkha In Akola ) दिल्याप्रकरणी एका पुरुषाला (60) अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

बडेगाव परिसरात तणावाचे वातावरण -

याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत शेकडो नागरिकांनी पोलीस ठाण्याचा घेराव केल्याने शुक्रवारी रात्री बडेगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गुन्हा दाखल -

बाळापूरचे इन्स्पेक्टर भाऊराव घुगे यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, त्या व्यक्तीने महिला आणि तिच्या मुलीला बुरखा न घालण्यास सांगितले. त्या व्यक्तीने आपल्यालाही शिवीगाळ केल्याचे त्यांनी सांगितले. गुऱ्हे म्हणाले की, ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा - Aurangabad : पती-पत्नीमधील वाद मिटवण्याची थाप मारून दागिने लांबविणारे परप्रांतीय भोंदू जोडपे पोलिसांच्या जाळ्यात

Last Updated : Feb 20, 2022, 10:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.