अकोला - जिल्हा प्रशासनाकडे आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ३३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. २३१ जणांच्या स्वॅबच्या अहवालांपैकी १९८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या १७३६ वर पोहोचली आहे.
३३ जणांमध्ये १७ महिला तर १६ पुरुष रुग्ण आहेत. त्यामध्ये बाळापूर येथील ११, बोरगाव मंजू येथील पाच, जेल क्वार्टर येथील तीन, पोळा चौक येथील दोन, सिंधी कॅम्प येथील दोन तर उर्वरित ज्ञानेश्वर नगर, मोठी उमरी, वानखडे नगर, कैलास नगर, आदर्श कॉलनी, वाशीम बायपास, महान, अकोट, खामगाव बुलडाणा व मालेगाव वाशीम येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
अकोला जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या १ हजार ७३६ वर पोहोचली आहे. यापैकी १२५८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या रुग्णालयात ३८९ जणांवर उपचार सुरु असून ८९ जणांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या अहवालानुसार
प्राप्त अहवाल-२३१
पॉझिटिव्ह-३३
निगेटिव्ह-१९८
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१७३६
मृत-८९(८८+१)
डिस्चार्ज -१२५८
दाखल रुग्ण(ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३८९