अकोला - शहरातील दुर्गा चौकात असलेले जनहित मेडिकल चोरट्याने फोडले. या चोरीत त्याने ६३ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना २५ नोव्हेंबरच्या पहाटे तीन वाजता घडली. दुकानमालकाच्या तक्रारीवरून शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झालेला या चोरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
दुर्गा चौकात संजोग बाजारे यांच्या मालकीचे जनहित मेडिकल आहे. चोरट्याने मेडिकलचे कुलुप तोडून आत प्रवेश केला व मेडिकलच्या गल्ल्यात असलेले ६३ हजार रुपये लंपास केले. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला. चोराने आपली ओळख पटू नये म्हणून चेहरा कपड्याने बांधून ठेवला होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला चोर ओळखावा कसा?
मेडिकलमध्ये चोरी करणारा चोर हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मात्र, त्याच्या चेहरा झाकलेला असल्याने त्याला ओळखावे कसे? असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे. तरीही पोलिसांनी त्याच्या शरीराच्या हालचालींवरून शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.