ETV Bharat / state

अकोला जिल्हा परिषद निवडणूक: 63 टक्के मतदान, आज मतमोजणी - अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषदेचे 53 गट व पंचायत समितीचे 106 गण यासाठी झालेल्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे.

मतदान केंद्रावरील छायाचित्र
मतदान केंद्रावरील छायाचित्र
author img

By

Published : Jan 8, 2020, 8:03 AM IST

अकोला - जिल्हा परिषदेचे 53 गट व पंचायत समितीचे 106 गण यासाठी मंगळवार (दि. 7 जाने) निवडणूक घेण्यात आली होती. दिवसभर 63.83 टक्के मतदान झाले असून आज (दि. 8 जाने.) सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

मतदान केंद्रावरील दृश्ये

मतदाना दिवशी कुठेही मतदान प्रक्रियेचा गोंधळ होईल, अशी कुठलीही घटना जिल्ह्यात घडली नाही. जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर ज्याठिकाणी मशीन खराब झाल्याच्या तक्रारी आल्या त्याठिकाणी तातडीने मशीन बदलण्यात आल्या आहेत. 14 मतदान यंत्र व 12 बॅलेट यंत्र बदलण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - अकोला महापालिकेची पाण्याच्या पाईप लाईन गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया

एक हजार 19 मतदान केंद्रावर आठ लाख 56 हजार मतदारांनी 780 उमेदवारांना मतदान केले. दरम्यान, सर्वच मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. आज मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - जिल्हा परिषदेच्या मतदानाला सुरुवात, केंद्रांवर मतदारांची गर्दी

Intro:अकोला - 53 जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीचे 106 गण यांची मतदानाची टक्केवारी अंदाजित 63 टक्के झाल्याचा अंदाज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. एकूण टक्केवारी काढण्यास वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कुठेही मतदान प्रक्रियेचा गोंधळ होईल, अशी कुठलीही घटना जिल्ह्यात कुठेच घडली नाही. 14 सीयू व 12 बियु बदलण्यात आल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. मतमोजणी 8 जानेवारी रोजी होणार आहे.Body:जिल्हा परिषदेच्या 53 गट व पंचायत समितीच्या 106 गणांसाठी आज मतदान झाले जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर ज्याठिकाणी मशीन खराब झाल्याच्या तक्रारी आल्या त्याठिकाणी तातडीने मशीन बदलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 14 सीयु व 12 बीयु मशीन जिल्ह्यातील मतदान केंद्रावर बदलून मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आली. एक हजार 019 मतदान केंद्रावर आठ लाख 56 हजार मतदारांनी 780 उमेदवारांना मतदान केले. दरम्यान, सर्वच मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. बुधवारी सकाळी 10 वाजतापासून मतमोजणी ला प्रारंभ होत आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी व्यक्त केली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.