ETV Bharat / state

हिवरखेड येथे अनोळखी आढळला महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ

author img

By

Published : Nov 3, 2020, 10:52 PM IST

बस स्टँड मागे जिओ मोबाईल टॉवर नजिक एका अनोळखी महिलेचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मृतदेह आज संध्याकाळी स्थानिक नागरिकांच्या दृष्टीस पडला. नागरिकांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली.

महिलेचा मृतदेह आढळला
महिलेचा मृतदेह आढळला

अकोला - तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील बसस्थानकाच्या मागे असलेल्या टॉवर नजिक एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. महिलेचा मृतदेह आज सायंकाळी आढळला. याप्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बस स्टँड मागे जिओ मोबाईल टॉवर नजिक एका अनोळखी महिलेचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह आज संध्याकाळी स्थानिक नागरिकांच्या दृष्टीस पडला. नागरिकांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर प्रभारी ठाणेदार धिरज चव्हाण, उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, गोपाल दातीर, आकाश राठोड यांच्यासह हिवरखेड पोलिसांचा ताफा घटनास्थळी आला. पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. तसेच, महिलेचा मृतदेह तेल्हारा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

महिलेचे वय अंदाजे ३५ ते ४० दरम्यान

महिलेचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षाच्या दरम्यान असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह जवळपास तीन दिवसापासून लटकलेल्या अवस्थेत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महिलेने लालसर कथिया रंगाची साडी परिधान केलेली असून महिलेच्या मृतदेहाजवळ एक मोबाईलही पोलिसांना मिळाला आहे. याप्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा- अमृत योजनेची कामे पूर्ण करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॉवरवर चढून सिनेस्टाइल आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.