अकोला- जिल्हा प्रशासनाकडे शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात तीन जण पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी सकाळी आलेले सात आणि सायंकाळी आलेले 3 अहवाल असे मिळून दिवसभरात दहा रुग्ण वाढले आहेत. काल एका रुग्णाचा मृत्यू झाला तर २२ जणांनी कोरोनावर मात केली.
सायंकाळी प्राप्त झालेले पॉझिटिव्ह अहवाल पुरुषांचे आहेत. ते तिघे अनुक्रमे आडगाव तेल्हारा, मोठी उमरी, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत.
दरम्यान, शुक्रवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांना तर कोविड केअर सेंटर मधून १७ जणांना असा एकूण २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६१७ वर पोहोचली आहे. यापैकी १२२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात ८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर ३११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
शुक्रवारी प्राप्त झालेले अहवाल-१८५
पॉझिटिव्ह अहवाल-१०
निगेटिव्ह-१७५
शुक्रवार पर्यंतची स्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- १६१७
मृत्यू-८४ (८३+१)
डिस्चार्ज-१२२२
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३११