अकोला- कृषी विषयक जिल्हा आढावा बैठकीसाठी आलेले कृषी मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज मुगाचे झाड दाखवून घोषणाबाजी केली.
मुगावर आलेल्या रोगामुळे संपूर्ण पीक खराब झाले आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी विभागाकडून कुठलेही प्रयत्न करण्यात आलेले नाही. शेतकरी हतबल झाला आहे. तसेच, पंचनामाही करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील मुग, उडीद व सोयाबीन पिकाला अतिवृष्टीमुळे फटका बसला असून त्याची पाहणी करण्याची मागणी केली आहे.
तसेच, नुकसानग्रस्तांना एकेरी ४० हजाराचे अनुदान, तसेच मुग-उडीद पिकाला १०० टक्के पीक विम्याची मदत आणि नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेत ग्रामपंचायतीचा सहभाग नसावा, अशा मागण्या केल्या आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी निदर्शने देखील केली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.
हेही वाचा- संशयिताने पोलिसांसमोरून काढला पळ; अकोला रेल्वे पोलीस घेतायेत शोध