ETV Bharat / state

वसतीगृह आणि आश्रम शाळा सुरू करा; आदिवासी विद्यार्थ्यांची मागणी - tribal students demanding to start schools

राज्य सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आणि आश्रम शाळा सुरू कराव्यात, या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. आदिवासी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने यासंदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी या आदिवासी विद्यार्थ्यांनी केली आहे.

वसतिगृह आणि आश्रम शाळा सुरू करा
वसतिगृह आणि आश्रम शाळा सुरू करा
author img

By

Published : Feb 15, 2021, 9:01 PM IST

अकोला - राज्य सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आणि आश्रम शाळा सुरू कराव्यात, या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. आदिवासी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने यासंदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी या आदिवासी विद्यार्थ्यांनी केली आहे.

वसतीगृह आणि आश्रम शाळा सुरू करा
या आहेत आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या - इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना वसतीगृहांमध्ये त्वरित प्रवेश देऊन त्यांना शैक्षणिक सत्रा करिता आर्थिक सहायता देण्यात यावे.- वसतीगृहातील माजी प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज त्वरित स्वीकारून त्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास आर्थिक सहाय्य द्यावे.- पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज त्वरित स्वीकारून त्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याकरिता आर्थिक सहाय्यता देण्यात यावी.- इयत्ता अकरावी तसेच युजी आणि पिजी या अभ्यासक्रमाकरिता नवीन विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारून त्यांचा वसतीगृह करता प्रवेश निश्चित करावा. - विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी.- त्यासोबतच मागील सत्रामध्ये प्रवेश विद्यार्थ्यांचा शेवटचा डीबीटी टप्पा त्वरित विद्यार्थ्यांना देण्यात यावा.- आश्रम शाळेतील माजी प्रवेशित विद्यार्थी तसेच नवीन विद्यार्थ्यांचे अर्ज त्वरित स्वीकारून त्यांना त्यांचा प्रवेश आश्रम शाळे करता निश्चित करावा. या मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले होते. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. या निवेदनातून शासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी या करण्यात आली आहे. जेणेकरून आदिवासी विद्यार्थी हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकेल.

हेही वाचा - कोरोनाची वाढती रुग्ण संख्या चिंतेची बाब - राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.