ETV Bharat / state

जवान वैभव माहुलकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Akola District Latest News

दिल्लीमध्ये झालेल्या अपघातामध्ये अकोल्यातील एनएसजी कमांडोचा मृत्यू झाला आहे. वैभव सुरेश माहुलकर असे या जवानाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी वैभव माहुलकर हे ड्युटीवर जात असताना, दाट धुक्यामुळे त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जवान वैभव माहुलकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

author img

By

Published : Jan 12, 2021, 5:40 PM IST

अकोला - दिल्लीमध्ये झालेल्या अपघातामध्ये अकोल्यातील एनएसजी कमांडोचा मृत्यू झाला आहे. वैभव सुरेश माहुलकर असे या जवानाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी वैभव माहुलकर हे ड्युटीवर जात असताना, दाट धुक्यामुळे त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान आज त्यांच्या मुळगावी मलकापूर येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वैभव माहुलकर हे गेल्या 6 वर्षांपासून लष्कर सेवेत कार्यरत होते. दिल्लीत झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव विमानाने त्यांच्या मुळगावी अकोल्यातील मलकापूरमध्ये आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर आज मलकापूरमधील मोक्षधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी त्यांना पुष्पचक्र आर्पण केले. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी वैभव माहुलकर यांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.