अहमदाबाद - शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत गुजरातमध्ये तळ ठोकला आहे. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे अपक्षांसह 35 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत गेलेले अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांची तब्येत खराब झाली आहे. त्यांना रुग्मालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्यावर उपचार करुन त्यांना पुन्हा हॉटेलमध्ये आणम्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुजरातच्या हॉटेलमध्ये 35 आमदार - एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत बंड केले आहे. त्यांच्यासोबत अपक्षासह 35 आमदार गुजरातच्या हॉटेलमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्यासोबत गेलेले अकोल्याचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हामप्रमुख नितीन देशमुख यांना अस्वस्थ वाट असल्याने त्यांना सूरतमधील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करुन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
काय आहे प्रकरण - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच वाद झाला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी भाषण केले नव्हते. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे तीन मत फुटले आहेत. त्याचे खापर एकनाथ शिंदेवर फोडण्यात आले. त्यामुळे हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. या वादातून एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांनी 35 आमदारासोबत गुजरातमधील सूरत येथील हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे फोन नॉट रिचेबल आहेत.
संजय राऊत यांचा दावा - राजस्थान आणि मध्यप्रदेशपेक्षा महाराष्ट्रातील राजकारण वेगळे आहे. भाजपची तेथील चाल महाराष्ट्रात चालणार नाही. भाजपने रचलेला हा कुटील कावा आहे. अशाप्रकारचे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र शिवसेनेत कोणताही भूकंप होणार नाही. आमचा शिवसेनेच्या आमदारांशी संपर्क झाल्याची दावा संजय राऊत यांनी केला आहे.