अकोला - इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेने आज जिल्हाधिकारी कार्यालय चौकात पेट्रोल फीलिंग युनिट आणि दुचाकीची प्रेतयात्रा काढली. यावेळी केंद्र सरकार विरोधात नारेबाजी करत ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.
सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले-
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर भरमसाठ वाढवले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. शेतकऱ्यांसाठी डिझेल दरवाढ ही न परवडणारी आहे. आत्ताच केंद्र सरकारने परत घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ करून सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडून टाकले आहे. या दरवाढीमुळे महागाई वाढणार आहे. ही दरवाढ मागे घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालय चौकात पेट्रोल फीलिंग युनिट आणि दुचाकीची प्रेतयात्रा काढली.
उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वात आंदोलन-
शिवसैनिकांनी केंद्र सरकार विरोधात नारेबाजी केली. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनामध्ये शिवसेनेची महिला आघाडी, युवा आघाडीही सहभागी झाली होती. हे आंदोलन शिवसेनेचे निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी सिटी कोतवाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
हेही वाचा- 'आधी केंद्राला टॅक्स कमी करायला सांगा, मग आम्ही विचार करू'