अकोला- आज सकाळी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या 333 अहवालापैकी 78 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त संख्या ही अकोला जिल्हा कारागृहातील बंदीवानांची आहे. 50 बंदीवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आधीचे 18 आणि आताचे 50 बंदिवान, असे एकूण 68 बंदीवानांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाच दिवशी 78 रुग्ण येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सकाळी 78 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.त्यामध्ये अकोला जिल्हा कारागृहातील 50 पुरुष कैद्यांचा समावेश आहे. उर्वरित 28 जणांमध्ये 11 महिला व 17 पुरुष आहेत. पातूर येथील सात जण, बाळापूर येथील सात जण, पोपटखेड ता.अकोट येथील सहा जण, राजदे प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित अकोट, बार्शी टाकळी, देवी खदान, अशोक नगर, जुने शहर, व्हीएचबी कॉलनी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान, अशोकनगर येथील 62 वर्षीय पुरुष असून हा रुग्ण 26 जून रोजी दाखल झाला होता. त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. बाळापूर येथील 55 वर्षीय पुरुष 14 जून रोजी दाखल झाला होता. त्याचा शनिवारी रात्री मृत्यू झाला.
सकाळी प्राप्त झालेले अहवाल
प्राप्त अहवाल-333
पॉझिटिव्ह अहवाल-78
निगेटिव्ह-255
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- 1498
मृत्यू-76 (75+1)
डिस्चार्ज-1047
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-378