अकोला - राज्यभरात दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या तिघांकडून सतरा दुचाकी जप्त केल्या आहेत. पकडण्यात आलेल्या तिघांपैकी एकजण मूळचा जळगाव येथील आहे. तर इतर दोघे नांदुरा येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रोहित निदाने, सय्यद वसीम सय्यद कदिर, सय्यद आझाद सय्यद कदिर अशी अटकेतील गाड्या चोरणाऱ्यांची नावे आहेत.
एकाला अटक केल्यावर सगळ्यांचाच भांडाफोड -
राज्यभरामध्ये दुचाकी चोरी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या घटनेतील आरोपींचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. अकोला स्थानिक गुन्हे शाखेने संशयित म्हणून रोहित निदाने यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने सय्यद वसीम सय्यद कदिर, सय्यद आझाद सय्यद कदिर या दोन साथीदारांच्याही नावांचा खुलासा केला.
हेही वाचा - रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच 'त्या' घटनेत मृत्यू, रुग्णालय प्रशासनाने फेटाळले आरोप
17 दुचाकी जप्त -
रोहित निदाने याने त्याच्या इतर साथीदारांचीही नावे सांगितली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले. तसेच, त्यांच्याकडून सतरा दुचाकी जप्त केल्या. अकोल्यामधीला 6, बुलडाणा जिल्ह्यातील 2 आणि जळगाव खान्देश येथील मिळून एकूण 17 दुचाकी जप्त केल्या. या प्रकरणात आता पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवलेंची राष्ट्रपतींना मागणी
आणखी गाड्या जप्त होण्याची शक्यता -
राज्यभरातही चोरी करण्यासाठी या तिघांचा संबंध असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. या तिघांकडून आणखी दुचाकी जप्त होण्याची शक्यता आहे, अशे पोलिसांनी सांगितले आहे.