ETV Bharat / state

आरोग्य उपसंचालक कार्यालयात महिला उमेदवारांची निवड प्रक्रिया ऐनवेळी रद्द, उमेदवारांचा रोष - अकोला बातमी

अकोला महापालिकेच्या 17 परिचरिकांच्या नियुक्तीसाठी आज आरोग्य उपसंचालक कार्यालयात पात्र उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी बोलाविण्यात आले होते. मात्र, बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांपेक्षा जास्त उमेदवार आल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. 200 पेक्षा जास्त उमेदवार असल्याने तसेच कार्यालयात गोंधळ झाल्याने रामदास पेठ पोलिसांना पाचारण करण्यात आले.

selection-process-of-women-candidates- canceled

author img

By

Published : May 28, 2021, 4:59 PM IST

Updated : May 28, 2021, 5:16 PM IST

अकोला - महापालिकेच्या 17 परिचारिकांच्या नियुक्तीसाठी आज आरोग्य उपसंचालक कार्यालयात पात्र उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी बोलाविण्यात आले होते. मात्र, बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांपेक्षा जास्त उमेदवार आल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. 200 पेक्षा जास्त उमेदवार असल्याने तसेच कार्यालयात गोंधळ झाल्याने रामदास पेठ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी महिला उमेदवारांना कार्यालय खाली करण्यास सांगितले. मात्र, पोलिसांनी या उमेदवारांशी उद्धट भाषा वापरल्याचे सांगितले जात आहे. यामुळे वातावरण चिघळले. अनेक उमेदवार या बाहेरगावाहून आल्या होत्या.

अकोला महापालिका आरोग्य विभागासाठी 17 परिचरिकांच्या जागा भरण्यात येत होत्या. या जागा भरण्यासाठी मनपाने आरोग्य विभागामार्फत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. त्यामध्ये पात्र उमेदवारांची निवड ही करण्यात आली. त्यांची यादी मनपाने ऑनलाइन प्रसिद्ध ही केली. तरीही यादीतील असलेल्या संख्येपेक्षा आरोग्य उपसंचालक कार्यालयात 200 च्या जवळपास उमेदवार जमा झाले होते. परिणामी कार्यालयात गोंधळ उडाला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या उमेदवारांना परत जाण्यास सांगितल्यावरही महिला उमेदवार परत गेल्या नाहीत. शेवटी कार्यालयात रामदास पेठ पोलिसांना बोलाविण्यात आले.

महिला उमेदवारांची निवड प्रक्रिया ऐनवेळी रद्द
रामदास पेठ पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी या उमेदवारांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. तरीही उमेदवार हे जात नव्हते. अनेक उमेदवारांनी पोलिसांसमोर आपला रोष व्यक्त केला. तेव्हा पोलीस निरीक्षक गुल्हाने यांनी परिस्थिती हाताळण्याऐवजी उमेदवार महिलांनाच आवाज कराल तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू, असा दम दिला. यामुळे महिला उमेदवार आणखी चिडल्या. परंतु, सर्व उमेदवारांना कार्यालयाच्या बाहेर काढल्यानंतर अनेक महिला या हळूहळू निघून गेल्या. ही प्रक्रिया रद्द केल्याने त्याही घरी गेल्या.
खुल्या गटातील नऊ उमेदवार घेतल्या कशा? महिलांचा आरोप -

महापालिका आरोग्य विभागासाठी 17 महिला परिचारिका घ्यायच्या होत्या. त्यापैकी नऊ उमेदवार या खुल्या गटातील आहेत. परंतु, या गटातील महिलांना कागदपत्रे न तपासता, मुलाखती न घेता आधीच कसे घेण्यात आले, असा प्रश्न काही महिला उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे या प्रकियेत गौडबंगाल झाले असल्याचा आरोप होत आहे.

Last Updated : May 28, 2021, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.