ETV Bharat / state

अकोल्यात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा; खरीप हंगामात शेतकरी हवालदिल

कंपनी जादा दराने विक्रेत्यांना बियाणे विकत असल्याने अनेक कृषी सेवा केंद्र संचालकांनी बियाणे खरेदी केले नाही. त्यामुळे कुठल्याच केंद्रावर शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे मिळत नाही. त्यामुळे शेतकरी बियाणे मिळत नसल्याने हतबल झाला आहे.

सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा
सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा
author img

By

Published : Jun 19, 2021, 10:12 AM IST

अकोला - पाऊस पडूनही शेतीकामांना वेग आला असला तरीही सोयाबीनचे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच कृषी सेवा केंद्रावर सोयाबीन बियाणे उपलब्ध नाही. त्यामुळे सोयाबीन बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. परंतु, कृषी विभाग मूग गिळून गप्प बसल्याने शेतकरी दुसरे पीक घेण्याचा विचारात आहे.

यावर्षी पाऊस वेळेवर आला. परंतु, तो सगळीकडे पडलेला नाही. अनेक भागात कपाशीची पेरणी शेतकर्‍यांनी केली आहे. तर दुसरीकडे जे शेतकरी सोयाबीन पेरतात. ते बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर आले आहेत. परंतु, कुठल्याच केंद्रावर शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे मिळत नाही. त्यामुळे शेतकरी बियाणे मिळत नसल्याने हतबल झाला आहे.

सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा

साठेबाजीचा आरोप
जे कृषी सेवा केंद्र चालक सोयाबीन बियाणे ओळखीतून विकत आहेत. तर काही बियाणे नसल्याचे सांगत आहे. तर काही जादा दराने बॅगच विकत आहे. महाबीजचे बियाणे बाजारात नाही. अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे दुसऱ्या कंपनीचे देण्यात येत आहे. बाजारात सोयाबीन बियाणे नसल्याने त्याचा साठेबाजी केल्याची शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आधीच शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केले आहे. परंतु, शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही, ही परिस्थिती आहे. कंपनी जादा दराने विक्रेत्यांना बियाणे विकत असल्याने अनेक कृषी सेवा केंद्र संचालकांनी बियाणे खरेदी केले नाही. त्यामुळे विक्रेत्यांकडे बियाणे नाही तर कृत्रिम तुटवडा होऊच शकत नाही, असे कृषी सेवा केंद्राचे संचालक शिव मालोकार यांनी सांगितले आहे.

सोयाबीन यावेळी बाजार समितीत 7 हजार 800 रुपयांपेक्षा जास्त क्विंटल दराने विकले गेले आहे. त्यामुळे पेरणीसाठी बीजवाईचे सोयाबीन ही शेतकऱ्यांनी विकले आहे. परिणामी, शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक नाही. विविध कंपनी आणि महाबीज सोयाबीन बियाणे विकले गेले आहे. जो माल शिल्लक आहे, तोही विकला जात असल्याने बाजारात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा होऊ शकत नाही, असा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

61 हजार क्विंटलची मागणी
यावर्षी महाबीजने 13 हजार 711 क्विंटल सोयाबीन बियाणे दिले आहे. तर खासगी कंपनीकडून 65 हजार 472 क्विंटल बियाणे बाजारात पुरवठा केला गेला आहे. असा एकूण 79 हजार 183 क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध होते. आतापर्यंत 77 हजार 621 क्विंटल विकल्या गेले आहे. या वर्षी कृषी विभागाने 61 हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी केली होती. दरवर्षी एक लाख 60 हजार क्विंटल बियाणे जिल्ह्यात लागते.

कृत्रिम तुटवडा नाही. कंपनीकडून बियाणे येणार आहे. आम्ही नियोजन केले आहे. आम्ही बियाणे कमी पडू देणार नाही. शेतकऱ्यांकडे बियाणे आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. कांताप्पा खोत यांनी सांगितले.

हेही वाचा - अमरावती : सुनील देशमुखांचा काँग्रेसी विचार संधीसाधू; भाजपाची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.