ETV Bharat / state

'सेव्ह मेरिट-सेव्ह नेशन’चे केंद्रीय राज्यमंत्री धोत्रेंच्या घरासमोर ‘थाळी बजाओ’ आंदोलन - BJP

अतिरिक्त आरक्षणामुळे खुल्या प्रवगार्तील गुणवंत व हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. हे अतिरिक्त आरक्षण रद्द करण्यात यावे या आशयाची मागणी घेऊन, ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ मोर्चाच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या घरासमोर थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.

Save merit save nation starts movement against additional reservation
author img

By

Published : Jul 28, 2019, 12:26 PM IST

अकोला - राज्यघटनेत आरक्षणाची मयार्दा ५० टक्के ठरवून देण्यात आली आहे. असे असतानाही, भाजपप्रणित राज्य शासनाने संविधानाने दिलेल्या पळवाटांचा वापर करत नैतिकतेला हरताळ फासून हे आरक्षण ७५ टक्क्यांपर्यंत नेले आहे. या आरक्षणामुळे खुल्या प्रवगार्तील गुणवंत आणि हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. हे अतिरिक्त आरक्षण रद्द करण्यात यावे, या आशयाची मागणी घेऊन ‘सेव्ह मेरीट-सेव्ह नेशन’ मोर्चाच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या घरासमोर रविवारी सकाळी थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.

'सेव्ह मेरिट-सेव्ह नेशन’चे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या घरासमोर ‘थाळी बजाओ’ आंदोलन

या थाळी बजाओ आंदोलनात शहरातील डॉक्टर्स, व्यवसायिक व अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते. या वेळी ‘सेव्ह मेरीट-सेव्ह नेशन’च्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांना निवेदन देण्यात आले. राज्य शासनाच्या या अतिरिक्त आरक्षणामुळे, खुल्या प्रवगार्तील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची गळचेपी होत आहे. मेरिट लिस्टमध्ये छत्तीस हजार नंबरला असणाऱ्या विद्यार्थ्याला आरक्षणातून मुंबईतील केईएम सारख्या नामवंत महाविद्यालयात अस्थिव्यंग या नामांकित कोर्सला प्रवेश मिळातो. तर,मेरिट लिस्टमध्ये चार हजार नंबरला असणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याला कोणतीही जागा यामध्ये मिळत नाही. असा आरोप निवेदनात करण्यात आला.

गुणी व हुशार विद्यार्थ्यांची या आरक्षणामुळे गळचेपी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिक व वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांनी ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’च्या घोषणा दिल्या. या अतिरिक्त आरक्षण संदर्भात रस्त्यावर जनजागृती करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Intro:अकोला - राज्य घटनेत आरक्षणाची मयार्दा ५० टक्के ठरवून देण्यात आली असतानाही भाजपप्रणित राज्य शासनाने संविधानाने दिलेल्या पळवाटांचा वापर करत नैतिकतेला हरताळ फासून हे आरक्षण ७५ टक्क्यांपर्यंत नेले आहे. या आरक्षणामुळे खुल्या प्रवगार्तील गुणवंत व हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून हे अतिरिक्त आरक्षण रद्द करण्यात यावे या आशयाची मागणी घेऊन ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ मोर्चाच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या घरासमोर रवीवारी सकाळी थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.
Body:या थाळी बजावं आंदोलनात शहरातील डॉक्टर्स ,व्यवसायिक व अनेक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक महिला पुरुष सहभागी झाले होते. या वेळी ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ च्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांना निवेदन देण्यात आले. राज्य शासनाच्या या अतिरिक्त आरक्षणामुळे गुणवत्ताधारक खुल्या विद्यार्थ्यांची गळचेपी होत असून छतीस हजार मेरिट लिस्ट नंबर असणाऱ्या विद्यार्थ्याला आरक्षणातून केएम मुंबई सारख्या नामवंत महाविद्यालयात अस्थिव्यंग या नामांकित कोर्सला प्रवेश मिळाला. तर चार हजार मेरिट लिस्ट क्रमांक असणाऱ्या खुल्या कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही जागा यामध्ये मिळत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. गुणी व हुशार विद्याथ्यार्ची या आरक्षणामुळे गळचेपी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिक व वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांनी ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ च्या घोषणा दिल्या. या अतिरिक्त आरक्षण संदर्भात रस्त्यावर जनजागरण करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

बाईट
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे

बाईट
डॉ. उत्पला मुळावकर
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.