ETV Bharat / state

भाजप देशाचे संरक्षण करणारे सरकार - संजय धोत्रे

या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मोठ्या संख्येने विजय होईल. तसेच अकोला मतदारसंघ हा चौथ्यांदा भाजपकडे राहणार, असा विश्वास अकोला मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांनी व्यक्त केला.

भाजप देशाचे संरक्षण करणारे सरकार - संजय धोत्रे
author img

By

Published : May 21, 2019, 9:34 AM IST

अकोला - संरक्षणाची भावना आणि विश्वासार्ह, असा भाजप पक्ष आहे. भाजप सरकारने कठोर निर्णय घेऊन देशात बदल घडविला. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मोठ्या संख्येने विजय होईल. तसेच अकोला मतदारसंघ हा चौथ्यांदा भाजपकडे राहणार, असा विश्वास अकोला मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांनी व्यक्त केला. त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना हा विश्वास व्यक्त केला.

भाजप देशाचे संरक्षण करणारे सरकार - संजय धोत्रे

लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. या निकालापूर्वी उमेदवारांनी आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी ही विजयी चौकार मारणार असल्याचे म्हटले आहे. देशात खंबीर नेतृत्व हे भाजपकडे असून इतर कुठल्याच पक्षाकडे असे नेतृत्व नाही आहे. तसेच भाजपची देशाबद्दलची एकनिष्ठता आणि पारदर्शक कारभार यामुळे देशातील जनतेने पंतप्रधान मोदी यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचा निर्धार केला आहे. विविध संस्थांचे येत असलेले एक्झिट पोल हे त्याचे उदाहरण आहे. या एक्झिट पोलमध्ये भाजप मोठ्या संख्येने निवडून येणार, असल्याचे दाखविण्यात आले आहे, असे धोत्रे यांनी यावेळी सांगितले.

एक्झिट पोलमध्ये राज्यात भाजपची संख्या कमी असली तरी त्याला वंचित बहुजन आघाडी किंवा मनसे कारणीभूत नसल्याचेही धोत्रे यांनी सांगितले. या निकालामुळे देशात पुन्हा स्थिर सरकार येणार असून देशाचा विकास हाच कळीचा मुद्दा या सरकारचा राहणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांनी टाळले बोलणे -

राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालणार, असा विश्वास व्यक्त करत या लोकसभा निवडणुकीमध्ये 48 जागांवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवार दिले. निवडणुकीनंतर एक्झिट पोल दाखविलेल्या आकडेवारीनुसार राज्यात वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नसल्याचे नमूद केले आहे. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

Intro:अकोला - देशात खंबीर नेतृत्व, संरक्षणाची भावना आणि विश्वासार्ह असलेला पक्ष म्हणजे भाजप. या भाजपच्या सरकारने कठोर निर्णय घेऊन देशात बदल घडविला. त्यामुळे या निकालाने भाजप मोठ्या संख्येने विजयी होऊन चौथ्यांदा अकोला मतदारसंघ भाजप राहणार असल्याचा विश्वास अकोला मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांनी आज व्यक्त केला.

Body:लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. निकालापूर्वी उमेदवारांनी आपापला विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी ही विजय चौकार मारणार असल्याचे म्हटले आहे. देशात खंबीर नेतृत्व हे भाजपकडे असून इतर कुठल्याच पक्षाकडे असे नेतृत्व नाही आहे. तसेच भाजपची देशाबद्दलची एकनिष्ठता आणि पारदर्शक कारभार यामुळे देशातील जनतेने पंतप्रधान मोदी यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचा निर्धार केला आहे. विविध संस्थांचे येत असलेले एक्झिट पोल हे त्याचे उदाहरण आहे. या एक्झिट पोलमध्ये भाजप मोठ्या संख्येने निवडून येणार असल्याचे दाखविण्यात आले आहे. हा मतदारांचा विश्वास असून ही त्यांची विजयी घोडदौड असल्याचं ते म्हणाले.
एक्झिट पोल मुळे राज्यातील विजयाची भाजपची संख्या जरी कमी असली तरी त्याला वंचित बहुजन आघाडी किंवा मनसे याला कारणीभूत नसल्याचे ते म्हणाले. या निकालामुळे देशात पुन्हा स्थिर सरकार येणार असून देशाचा विकास हाच कळीचा मुद्दा या सरकारचा राहणार आहे. अकोल्यातही भाजपच विजय होईल, असा आत्मविश्वास भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांनी व्यक्त केला आहे.

Conclusion:प्रकाश आंबेडकरांनी बोलण्यास टाळले
राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी चा फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालणार, असा विश्वास व्यक्त करीत या लोकसभा निवडणुकीमध्ये 48 जागांवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवार दिले. निवडणुकी नंतर एक्झिट पोल दाखविलेल्या आकडेवारीनुसार राज्यात वंचित बहुजन आघाडी चा एकही उमेदवार निवडून येणार नसल्याचे नमूद केले आहे. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी काहीच बोलायचे नसल्याचे सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.