ETV Bharat / state

'अखजी आली, अखजी आली, अखर पाखर करती आपले मराठी लोक'

अक्षयतृतीया सणाच्या दिवशी पूर्वजांची पूजा करण्यात येते. यावेळी त्यांना आवडणारे पदार्थ करून ते ताट पूजेच्या वेळी त्यांच्या फोटोसमोर ठेवण्यात येते. या पदार्थांमध्ये चिंचोणी हा पदार्थ महत्त्वाचा असतो. ही चिंचोणी तयार करण्यासाठी काही सामग्रींची आवश्यकता असते. या सामग्रीला 'गवला कचूला' चा पुडा असे म्हणतात. गवला कचुला या पुड्यात मोहाचे फुल, कचुला, गवला, खोबरं, शेंगदाणे, सोप, खडीसाखर, लवंग, बदाम, तिळ, खारीक, चणाडाळ, चिकणी सुपारी, इलायची, ओवा, धने, धनिया डाळ, काजू, गोलंबी, चिंच, खाकस, कथ्था, जिरा, कलमी आदी पदार्थांचा समावेश असतो.

अक्षयतृतीयेसाठी लागणाऱ्या साहित्याची गाणे गात विक्री
author img

By

Published : May 6, 2019, 9:58 PM IST

अकोला - 'गवल कचुला चारोळीवाले या दिन आले हो आखजीवाले...अखजी आली अखजी अली, अखर पाखर करतील आपले मराठी लोक...' असा गाण्याचा सूर अकोल्यातील बाजारात सध्या ऐकण्यास मिळत आहे. या गाण्यामुळे अक्षयतृतीया सण आल्याची सूचना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेते हे गाणे गात असतानाचे चित्र आहे. त्यांच्या गाण्याचे सूर हे दूरपर्यंत जात असल्याने ग्राहकही साहित्य घेण्यास बाध्य होत आहेत.

अक्षयतृतीयेसाठी लागणाऱ्या साहित्याची गाणे गात विक्री

अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त आहे. त्यामुळे या स्थानाला फार महत्त्व आहे. या सणाच्या दिवशी आपल्या पूर्वजांची पूजा करण्यात येते. त्यांच्यासमोर त्यांना आवडणारे पदार्थ करून ते ताट पूजेच्या वेळी त्यांच्या फोटोसमोर ठेवण्यात येते. या पदार्थांमध्ये महत्त्वाचा पदार्थ जो असतो ती म्हणजे 'चिंचोणी'. मानाची असलेली चिंचोणी ही चिंचेपासून बनविण्यात येत असली तरी ते बनवण्यासाठी आवश्‍यक असलेल्‍या सामग्रीलाही मान आहे. ती सामग्री टाकूनच ही चिंचोणी बनविण्यात येते. या सामग्रीला 'गवला कचूला' चा पुडा असे म्हणतात. हा पुडा विकताना विक्रेता विशिष्ट गाणे म्हणून ते विकतात. विक्रेत्याच्या वडिलोपार्जितपासून ही परंपरा सुरू असल्याने तो त्या पद्धतीने गाणे म्हणत ग्राहकांना आकर्षित करतो.

हा प्रकार अकोल्यातील जनता भाजी बाजारात आपणास दिसून येतो. विशाल दत्तात्रय सईनसोनकर हे आपले वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत आहेत. वडिलांकडून मिळालेल्या शिक्षेतून ते अक्षय्य तृतीयेनिमित्त आवश्यक सामग्री विकत आहे. ही सामग्री विकताना ते विविध गाणे गात असतात. विशेष म्हणजे, या संपूर्ण गाण्यांमध्ये चिंचोणीच्या साहित्यापासून तर पूजेच्या शेवटच्या क्षणापर्यंतचा सहवास किंबहुना क्रिया त्यामध्ये समाविष्ट आहे. तसेच ही चिंचोणी बनविताना आवश्यक असलेले पदार्थही आणि त्यांचे गुण या गाण्यात यात समाविष्ट आहे. त्यामुळे हे गाणे ऐकण्यास सुंदर वाटते. तसेच या गाण्याची चालही वेगळ्या पद्धतीने असल्याने हे गाणे ग्राहकांना आकर्षित करत आहे. या गाण्यातून अक्षय तृतीया सण आल्याची सूचनाही हा विक्रेता ग्राहकांना देतो. त्यामुळे ग्राहक साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे आकर्षित होतात. जोपर्यंत अक्षय तृतीयेचा सण चालतो, तोपर्यंत हा विक्रेता हे गाणे गात असतो. ग्राहकांना आपल्या पूर्वजांची आठवण करून देण्यासाठी हा सण साजरा करा, असा संदेशही त्यांच्या गाण्यातून ते देतात.

'गवला कचूला' पुड्यातील सामग्री

अक्षय तृतीयासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांमध्ये 'गवला कचुला' या पुड्यात मोहाचे फुल, कचुला, गवला, खोबरं, शेंगदाणे, सोप, खडीसाखर, लवंग, बदाम, तिळ, खारीक, चणाडाळ, चिकणी सुपारी, इलायची, ओवा, धने, धनिया डाळ, काजू, गोलंबी, चिंच, खाकस, कथ्था, जिरा, कलमी आदी पदार्थांचा समावेश असतो.

Intro:अकोला - 'गवल कचुला चारोळीवाले यादिन आले हो आखजीवाले, अखजी आली अखजी अली, अखर पाखर करतील आपले मराठी लोक....' असा गाण्याचा सूर अकोल्यातील बाजारात सध्या ऐकण्यास येत आहे. या गाण्यामुळे अक्षयतृतीया सन आल्याची सूचना जसे हे विक्रेते देत आहेत. यानिमित्ताने मानाचे साहित्य विक्रेता विकताना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हे गाणे गात असतानाचे चित्र आहे. त्यांच्या गाण्याचे सूर हे दूरपर्यंत जात असल्याने ग्राहकही साहित्य घेण्यास बाध्य होत आहे.

Body:अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त आहे. त्यामुळे या स्थानाला फार महत्त्व आहे. या सणाच्या दिवशी आपल्या पूर्वजांची पूजा करण्यात येते. त्यांच्यासमोर त्यांना आवडणारे पदार्थ करून ते ताट पूजेच्या वेळी त्यांच्या फोटो समोर ठेवण्यात येते. या पदार्थांमध्ये महत्त्वाचा पदार्थ जो असतो ती म्हणजे 'चिंचोणी'. मानाची असलेली चिचोनि ही चिंचेपासून बनविण्यात येत असली तरी ही चिचोणी बनविण्यासाठीही आवश्‍यक असलेल्‍या सामग्रीला ही मान आहे. ती सामुग्री टाकूनच ही चाचणी बनविण्यात येते. ही सामुग्री विकताना तिला 'गवला कचूला' चा पुडा असे म्हणतात. हा पुडा विकताना विक्रेता विशिष्ट गाणे म्हणून ते विकतात. या गाण्याला जरी परंपरा नसली तरीही विक्रेत्याच्या वडिलोपार्जित पासून ही परंपरा सुरू असल्याने तो त्या पद्धतीने गाणे म्हणत ग्राहकांना आकर्षित करीत आहे.
हा प्रकार अकोल्यातील जनता भाजी बाजारात आपणास दिसून येतो. विशाल दत्तात्रय सईनसोनकर वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत आहेत. वडिलांकडून मिळालेल्या शिक्षेतून ते अक्षय्य तृतीयेनिमित्त आवश्यक सामग्री विकत आहे. ते सामुग्री विकताना विविध गाणे गात असतात. विशेष म्हणजे, या संपूर्ण गाण्यांमध्ये चिचोणी च्या साहित्यापासून तर पूजेच्या शेवटच्या क्षणापर्यंतचा सहवास किंबहुना क्रिया त्यामध्ये समाविष्ट आहे. तसेच ही चिचोणी बनवितांना आवश्यक असलेले पदार्थही आणि त्यांचे गुण या गाण्यात यात समाविष्ट आहे. त्यामुळे हे गाणं ऐकण्यास सुंदर वाटतं आणि या गाण्याची चाल ही वेगळ्या पद्धतीने असल्याने हे गाणं ग्राहकांना आकर्षित करते. या गाण्यातून अक्षय तृतीया हा सण आल्याची सूचनाही हा विक्रेता ग्राहकांना देतो. त्यामुळे ग्राहक हे साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे आकर्षित होतात. जोपर्यंत अक्षय तृतीयेचा सण चालतो, तोपर्यंत हा विक्रेता हे गाणं गात ग्राहकांना आपल्या पूर्वजांची आठवण करून देण्यासाठी हा सण साजरा करा, असा संदेशही त्यांच्या गाण्यातून ते देतात.

'गवला कचुला' पुड्यातील सामग्री
अक्षय तृतीया साठी आवश्यक असलेल्या पदार्थांमध्ये मोहाचे फुल, कचुला, गवला, खोबरं, शेंगदाणे, सोप, खडीसाखर, लवनग, बदाम, तिळ, खारीक, चणाडाळ, चिकणी सुपारी, इलायची, ओवा, धने, धनिया डाळ, काजू, गोलंबी, चिंच, खाकस, कथ्था, जिरा, कलमी सह आदी पदार्थांचा समावेश 'गवला कचुला' या पुड्यात असतो.

Conclusion:सूचना - सोबत पॅकेज करून पाठविले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.