अकोला - ग्रामीण भागात जाऊन दारू आणणाऱ्या अकोल्यातील तळीरामांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दारूची वाहतूक अवैध असल्याने बोरगाव मंजू पोलिसांनी 12 तळीरामांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दारूसह ११ दुचाकी असा एकूण पाच लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अकोला शहरामध्ये टाळेबंदीमुळे दारू विक्री बंद आहे. परंतु, ग्रामीण भागात टाळेबंदीचे नियम शिथील करून दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. या परिस्थितीमध्ये शहरातील अनेक नागरिक हे ग्रामीण भागामध्ये जाऊन दारू आणत आहेत. ज्यांच्याकडे परवाना आहे ते बाहेरगावावरून मद्य आणू शकतात. परंतु, ज्यांच्याकडे परवाना नाही असे तळीराम ग्रामीण भागातून मुद्द्याची वाहतूक करीत आहेत. अशा तळीरामांवर बोरगाव मंजू पोलिसांनी मद्याची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करत आहेत.
हेही वाचा-मुंबईत कोरोनाचे नवे 884 रुग्ण, एकूण संख्या 18 हजार 396 वर
या कारवाईमुळे ग्रामीण भागातून दारू आणणाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. पोलिसांनी बोरगाव, सांगळुड, गझिपुर भागात कारवाई करून तळीरामांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस निरीक्षक हरीश गवळी करत आहेत.
हेही वाचा-आर्थिक पॅकेज पाचवा टप्पा: सीतारामन आज सकाळी अकरा वाजता करणार घोषणा