अकोला - अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या चौघांवर बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याजवळून पोलिसांनी 86 हजार 224 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विशेष पथक बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरीता गस्तीवर होते. गुप्त माहितीच्या आधारे पथकाला अवैध दारु बोरगाव मंजुमधून वाशिंबाकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने नरेश मनोहर सोळंके, राम संतोष विदोकार, मुश्ताक शाह दुर्बान शाह, मोहम्मद जुनेद मोहम्मद लतिफ यांच्याकडून दोन दुचाकी व देशी दारुचे ३९२ क्वार्टर असा एकूण ८६ हजार २२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाई बोरगाव मंजू पोलीस करत आहेत.