ETV Bharat / state

पिवंदळच्या विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे; पक्क्या रस्त्याची केली मागणी - Pivandal Khurd student demand road

कच्चा रस्ता असल्याने गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज तीन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची एक तासिका बुडते. परिणामी नांदखेड येथील शाळेतील शिक्षक पिवंदळ खुर्द गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना उशीर झाला म्हणून शिक्षा देतात.

akola
धरणे आंदोलन करताना विद्यार्थी
author img

By

Published : Jan 2, 2020, 4:53 PM IST

अकोला- पिवंदळ खुर्द ते नांदखेड या दरम्यान पक्का रस्ता बांधण्यात यावा या मागणीसाठी पिवंदळ खुर्दच्या विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्याच्या समस्येबाबत आपली कैफियत मांडली.

माहिती देताना विद्यार्थिनी व गावातील तंटामुक्त अध्यक्ष

तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ खुर्द ते नांदखेड हा तीन किलोमीटर रस्ता कच्चा आहे. हा रस्ता बांधण्यात यावा यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने लोकप्रतिनिधींकडे निवेदने देऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले होते. पिवंदळ खुर्द हे गाव हागणदारीमुक्त झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ग्रामस्थांना रस्ता बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, हा रस्ता अद्यापही बांधण्यात न आल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. तसेच नागरिकांनाही प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

पिवंदळ खुर्द आणि नांदखेड या दोन्ही गावात वाहतुकीसाठी पक्का रस्ता नसल्यामुळे या गावांमध्ये खासगी वाहन किंवा एसटी बसेस ये-जा करीत नाही. त्यामुळे, वाहतूक करण्यासाठी पिवंदळ खुर्द गावातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कच्चा रस्ता असल्याने या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज तीन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची एक तासिका बुडते. परिणामी नांदखेड येथील शाळेतील शिक्षक पिवंदळ खुर्द गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना उशीर झाला म्हणून शिक्षा देतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी पिवंदळ खुर्द येथील विद्यार्थी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्याची समस्या सोडविण्याची मागणी केली.

हेही वाचा- अकोल्यात 3 मजली इमारत कोसळली

Intro:अकोला - पिवंदळ खुर्द ते नांदखेड यादरम्यान पक्का रस्ता बांधण्यात यावा या मागणीसाठी पिवंदळ खुर्द च्या विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठले िल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन त्यांनी आपली कैफियत मांडली.Body:तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ खुर्द ते नांदखेड हा तीन किलोमीटर रस्ता कच्चा आहे. हा रस्ता बांधण्यात यावा, यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने लोकप्रतिनिधींकडे निवेदने देऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले होते. हे गाव हागणदारीमुक्त झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी या ग्रामस्थांना रस्ता बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, हा रस्ता अद्यापही बांधण्यात न आल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. या दोन गावांच्या संपर्कासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे या गावातून खाजगी वाहन किंवा एसटी बसेसही या ठिकाणाहून ये-जा करीत नाही. त्यामुळे वाहतूक करण्यासाठी या गावातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. कच्चा रस्ता असल्याने या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तीन किलोमीटर दररोज पायपीट करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची एक तासिका बुडते. परिणामी नांदखेड येथील शाळेतील शिक्षक पिवंदळ खुर्द गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना उशीर झाला म्हणून बाहेर उभे करतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी पिवंदळ खुर्द येथील विद्यार्थी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्याची समस्या सोडविण्याची मागणी केली.

बाईट - योगिता बघे
विद्यार्थ्यांनी, पिवंदळ खुर्द

बाईट - विठ्ठल तळोकार
तंटामुक्त अध्यक्ष, पिवंदळ खुर्दConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.