ETV Bharat / state

गांधीग्राम येथील पूर्णा नदीपात्रात उतरून आंदोलन; न्याय मिळेपर्यंत पाण्यातून बाहेर न निघण्याचा पवित्रा

अमरावती जिल्ह्याच्या अंबा नाल्याचे पाणी पूर्णा नदी मिसळत असल्याने अकोला जिल्ह्यातील अनेक गावांना दूषित पाणी मिळत आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये आजार उद्भवत आहे. या विरोधात गणेश पोटे यांच्या नेतृत्त्वाखाली गावकऱ्यांनी नदीपात्रात उभे राहत आंदोलन केले आहे.

author img

By

Published : Sep 16, 2020, 3:26 PM IST

आंदोलक
आंदोलक

अकोला - अमरावती जिल्ह्यातील अंबा नाल्याचे पाणी पेढी नदीमार्गे पूर्णा नदीत मिळत आहे. यामुळे अकोला जिल्ह्यातील पूर्णा नदी संपूर्णपणे दूषित होत असल्याच्या निषेधार्थ गणेश पोटे यांच्या नेतृत्त्वाखाली गावकऱ्यांनी गांधीग्राम येथील पूर्णा नदीपात्राच्या पाण्यात उतरून आज (16 सप्टेंबर) आंदोलन केले. या आंदोलनाला माजी आमदार जगन्नाथ ढोणे हे देखील सहभागी झाले होते. तसेच गांधीग्राम येथील भोई समाजाने ही या आंदोलनात सहभाग नोंदवला.

आंदोलक

अमरावती जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीचे दूषित पाणी पूर्णा नदीपात्रात सोडले जात असून यामुळे ही नदी दूषित होत आहे. यामुळे अनेक आजार उद्भवत आहेत. दूषित पाण्याच्या संदर्भात लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा ही केला. मात्र, अद्यापही शासनाने याबाबत दखल घेतली नाही. म्हणून शासनाचे लक्ष या गंभीर विषयावर वेधण्यासाठी गांधीग्राम येथील नदीत उतरून आंदोलन करण्यात येत आहे, असे गणेश पोटे यांनी सांगितले. जबाबदार अधिकारी येऊन याबाबत दखल घेत नाही, तोपर्यंत पाण्याच्या बाहेर निघणार नसल्याचा पवित्रा पोटे यांनी घेतला आहे.

अकोला जिल्ह्यातील गोपालखेड, गांधीग्राम, केळीवेळी, दोनवाडा आदी गावे ही खारपाण पट्ट्यात येतात. पूर्णा नदी काठावरील गावांना मानवी व पशुधनांसाठी या पाण्याचा उपयोग करावा लागतो. भूगर्भात पिण्याचे पाणी या पट्ट्यात उपलब्ध नसल्यामुळे ही पूर्णा नदी सर्व गावांची जीवनदायीनी नदी म्हणून ओळखले जाते. मात्र, अमरावती जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीचे दूषित पाणी या नदी पात्रात सोडले जात असल्यामुळे ही नदी दूषित होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही औद्योगिक वसाहतीचे पाणी पूर्णा नदी पात्रात मिसळून पाणी दूषित झाल्याचा निर्वाळा दिला आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी, निरी संस्था, नागपूर, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, उपप्रादेशिक प्रदूषण मंडळ यांनीही यावर काहीच उपाययोजना केला नसल्याचा आरोप माजी आमदार जगन्नाथ ढोणे यांनी केला आहे.

हेही वाचा - अन्....त्याने तीनचाकी सायकल रिक्षावर बसून सुरू केले बेमुदत उपोषण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.