अकोला - 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'ची घोषणा देत शनिवारी खुल्या प्रवर्गातील नागरिकांनी शहरात भव्य रॅलीचे आयोजन केले होते. आरक्षण बंद करण्याच्या मुख्य मागणीला घेऊन ही रॅली सिव्हिल लाईन चौकातून मार्गस्थ झाली.
आरक्षण बंद व्हावे किंवा ते 50 टक्केच ठेवावे या मुख्य मागणीसाठी खुल्या प्रवर्गातील नागरिकांनी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या घरासमोर थाली बजाओ आंदोलन केले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी तीन दिवस धरणे दिले. त्यानंतर त्यांनी दुपारी 'सेव्ह मेरीट सेव्ह नेशन'ची घोषणा देत शहरातून भव्य रॅली काढली. या रॅलीत डॉक्टर, इंजिनीयर, व्यापारी व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या रॅलीतील नागरिकांनी घोषणा देत परिसर दणाणून टाकला होता. यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली मागणी शासन दरबारी पाठवावी.