अकोला - दिल्ली येथे धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परतलेल्या वाडेगाव येथील १८ संदिग्ध रुग्णांपैकी ९ जणांचे वैद्यकीय अहवाल शुक्रवारी निगेटीव्ह आले होते. तर उर्वरीत ९ जणांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची प्रतीक्षा होती. ते ही अहवाल निगेटिव्ह आले असल्याने अकोलेकरांचा जीव भांड्यात पडला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत अकोल्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. तर पातूर येथील 13 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळापूर पोलिसांच्या मदतीने मंगळवारी रात्री उशीरा १८ जणांना कोरोनाचे संदिग्ध रुग्ण म्हणून सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. हे १८ जण दिल्ली येथील एका धामिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. परंतु, ते २ मार्च रोजीच अकोल्यात परतल्याचेही सांगण्यात येत होते. त्यांचे वैद्यकीय चाचणी नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी सकाळी यातील ९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह असल्याचे समोर आहे. तर उर्वरित 9 जणांचे अहवाल ही निगेटिव्ह आले आहे. तर पातूर येथील 13 जण हे वाशिम येथील एका व्यक्तीच्या संपर्कात आलेले होते. त्यांना ही आयोसोलेशन वॉर्डात ठेवले आहे. त्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नाही. त्यामुळे त्यांच्या अहवालानंतरच अकोल्यातील कोरोना पॉझिटिव्ह आहे किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे.