अकोला - जिल्ह्यात आज (सोमवार) सकाळी प्राप्त कोरोना तपासणी अहवालात 22 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 263 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यामधून 241 जण निगेटिव्ह आले आहेत.
सकाळी प्राप्त 22 पॉझिटिव्ह अहवालात 10 महिला व 12 पुरुष आहेत. या 22 जणांपैकी चारजण गजानन नगर, चारजण कळंबेश्वर येथील, तीनजण गाडगेनगर, दोनजण हरिहर पेठ. दोनजण सिंधी कॅम्प, तर दगडी पुल, अकोट फैल, अयोध्यानगर, डाबकीरोड, आदर्श कॉलनी, कामा प्लॉट व विठ्ठल मंदिर येथील प्रत्येकी एकजण याप्रमाणे रहिवासी आहेत.
प्राप्त अहवाल - २६३
पॉझिटिव्ह अहवाल - २२
निगेटिव्ह - २४१
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - १५३२
मृत - ७७ (७६+१)
डिस्चार्ज - १०७५
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह) - ३८०