अकोला - कोरोना रुग्णांचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला. त्यामध्ये सकाळी दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसभरात14 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यासोबत 17 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सकाळी दोन रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
नव्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये चार महिला व सहा पुरुष आहेत. त्यातील चार जण बाळापूर येथील दोन जण हरिहरपेठ येथील रहिवासी आहेत.
तर उर्वरित गुलजारपुरा, त्रिमुर्तीभवन, जुने शहर. मोठी उमरी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान, आज दुपारनंतर 17 जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यातील 13 जणांना घरी तर चार जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
प्राप्त अहवाल-110
*पॉझिटीव्ह-14
*निगेटीव्ह-96
सद्यस्थिती
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- 1106
*मयत-58 (57+1)
* डिस्चार्ज-724
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)