ETV Bharat / state

गॅस दरवाढ विरोधात राष्ट्रवादी महिला कांग्रेसचे आंदोलन; मोदी सरकाचा निषेध

author img

By

Published : Feb 7, 2021, 7:59 AM IST

Updated : Feb 7, 2021, 8:51 AM IST

केंद्र सरकारने गॅस सिलेंडरचे भाव वाढवून सामान्य कुटुंबावर आर्थिक संकट उभे केले आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. मिळालेल्या कामावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागत आहे. मात्र, केंद्र सरकार मनमानी पध्दतीने दरवाढ करीत आहे.

गॅस दरवाढ विरोधात राष्ट्रवादी महिला कांग्रेसचे आंदोलन

अकोला -दिवसेंदिवस होणाऱ्या गॅसदरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी महिला शहर काँग्रेसच्यावतीने जठारपेठ चौकातील हनुमान मंदिराजवळ आंदोलन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी चक्क चूलीवर स्वयंपाक करत सरकारच्या गॅसदरवाढीचा निषेध केला. तसेच इतर महिलांना गौऱ्या भेट देत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

गॅसदरवाढीमुळे सामन्य कुटुंबावर आर्थिक संकट

केंद्र सरकारने गॅस सिलेंडरचे भाव वाढवून सामान्य कुटुंबावर आर्थिक संकट उभे केले आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. मिळालेल्या कामावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागत आहे. मात्र, केंद्र सरकार मनमानी पध्दतीने दरवाढ करीत आहे. आधीच इंधन दरवाढीने महागाई वाढलेली असताना त्यात गॅस दरवाढ करून केंद्र सरकार आर्थिक चटका देत आहे. ही दरवाढ मागे न घेतल्यास हजारो गरीब आणि सामान्य कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. सहानुभूती पूर्वक विचार न करता सरकारने ही वाढ केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष रिजवाना शेख अजीज यांनी केला आहे. या आंदोलनात कार्यअध्यक्षा भारती निम, उपाध्यक्षा जया शूक्ला, संज्योती मांगे, पूर्व ब्लॉक अध्यक्षा सुनिता देशमुख आदी उपस्थित होत्या.

गौऱ्या दिल्या भेट...
गॅस दरवाढीने गॅस खरेदी करणे जोखमीचे झाले आहे. त्यामुळे सरकार चुलीवर स्वयंपाक करण्यास भाग पाडत असल्याने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी इतर महिलांना गौऱ्या भेट म्हणून देण्यात आल्या.

Last Updated : Feb 7, 2021, 8:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.