ETV Bharat / state

नीट परीक्षा केंद्रावर पालक व विद्यार्थ्यांसाठी मुस्लिम बांधवांकडून पाण्याची व्यवस्था - पाणी

नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) ही राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यात आली. भावी डॉक्टर बनण्यासाठी आवश्यक नीट परीक्षा शहरात १५ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.

नीट परीक्षा केंद्रावर पालक व विद्यार्थ्यांसाठी मुस्लिम बांधवांकडून पाण्याच्या व्यवस्था
author img

By

Published : May 6, 2019, 8:06 AM IST

अकोला - नीट परीक्षेदरम्यान विद्यार्थी आणि पालकांना मन:स्ताप सहन करावा लागला. यावर्षी अकोल्यात पहिल्यांदाच 'नीट' परीक्षेसाठी केंद्रे देण्यात आली. मात्र, अनेक परिक्षा केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच नव्हती. तर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पालकांना मंडप नसल्याने उन्हातच ताटकळत उभे राहावे लागले. तेव्हा नोएल शाळेला लागून असलेल्या मस्जिदमधील मुस्लिम बांधवांनी माणुसकीचा परिचय देत विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली.

नीट परीक्षा केंद्रावर पालक व विद्यार्थ्यांसाठी मुस्लिम बांधवांकडून पाण्याच्या व्यवस्था

नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) ही राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यात आली. भावी डॉक्टर बनण्यासाठी आवश्यक नीट परीक्षा शहरात १५ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. अकोल्यात तापमानाचा पारा वाढला असताना भर दुपारी १२ वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर परिक्षेसाठी बोलावण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे नातेवाईक सुद्धा परीक्षा केंद्रावर पोहचले. मात्र, संबधीत प्रशासनाने परीक्षा केंद्राबाहेर, प्रवेशद्वार येथे उभे राहण्यासाठी सावलीची व्यवस्था केलेली नव्हती. कडक उन्हात पिण्याचे पाणीही उपलब्ध करून देण्यात आलेले नव्हते.

ही बाब लक्षात येताच नोएल शाळेला लागून असलेल्या मस्जिदमधील मुस्लिम बांधवांनी माणुसकीचा परिचय देत विद्यार्थी आणि त्यांचे नातेवाईक यांना सावलीत उभे राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. या व्यतिरिक्त परीक्षा शांततेत पार पडली.

Intro:- पालक, विध्यार्थीसाठी पाण्याची केली व्यवस्था

अकोला - नीट परीक्षेदरम्यान विद्यार्थी आणि पालकांना आज मन:स्ताप सहन करावा लागला. यावर्षी अकोल्यात पहिल्यांदाच 'नीट' परिक्षेसाठी केंद्रं देण्यात आले. अनेक परिक्षा केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच नव्हतीय. तर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पालकांना मंडप नसल्यानं उन्हातच ताटकळत थांबावं लागल. अकोल्यातील नोएल आणि न्यू इंग्लिश स्कुल या दोन्ही केंद्रांवर व्यवस्थेचा पार बोजवारा उडाल्याचं दिसून आलंय. दरम्यान, नोएल शाळेला लागून असलेल्या मस्जिदमधील मुस्लिम बांधवांनी माणुसकीचा परिचय देत विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली.Body: नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) ही राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यात आली. भावी डॉक्टर  बनण्यासाठी आवश्यक नीट परीक्षा शहरात 15  परीक्षा केंद्रांवर घेन्यात आली. जगात विक्रम करणारे तापमान अकोल्यात असतांना भर दुपारी 12 वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलाविण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे नातेवाईक सुद्धा परीक्षा केंद्रावर पोहचले. परीक्षा केंद्राबाहेर ,प्रवेशद्वार येथे उभे राहण्यासाठी  सावली ची व्यवस्था करण्यात आली नाही. एवढया कडक उन्हात पिण्याचे पाणीही उपलब्ध करून देण्यात आले नाही. नोएल शाळेला लागून असलेल्या मस्जिदमधील मुस्लिम बांधवांनी माणुसकीचा परिचय देत विद्यार्थी आणि त्यांचे नातेवाईक यांना सावलीत उभे राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात होती. पाणी पिण्यासाठी सामाजिक संस्था, मस्जिद प्रशासक यांनी व्यवस्था केली होती. सर्व 15 शाळांमध्ये परीक्षा केंद्रांवर गैरसोय होत असल्याचे दिसून आले. याव्यतिरिक्त परीक्षा शांततेत पार पडली. Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.