ETV Bharat / state

एचआयव्ही संक्रमित व्यक्तीचे रक्त दिल्याने चिमुकली झाली पॉझिटिव्ह; नातेवाईकांची आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार - अकोला चिमुकलीस एचआयव्हीची बाधा

चिमुकलीला ताप जास्त येत असल्याने तिला परत डॉ. अवघाते यांच्याकडे दाखल करण्यात आले. त्यांनी या चिमुकलीच्या चाचणीसाठी तिला अमरावती येथे पाठविले. तिच्या चाचण्या केल्यानंतर त्या चिमुकलीला एचआयव्ही असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. एचआयव्ही चाचणीमध्ये ती चिमुकली पॉझिटिव्ह आली.

संक्रमित व्यक्तीचे रक्त दिल्याने चिमुकली झाली पॉझिटिव्ह

author img

By

Published : Sep 2, 2021, 8:38 AM IST

Updated : Sep 2, 2021, 12:19 PM IST

अकोला - एचआयव्ही संक्रमित व्यक्तीचे रक्त तीन दिवसांच्या चिमुकलीला देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूरमध्ये घडला आहे. या एचआयव्ही बाधित रक्तामुळे ती चिमुकलीही पॉझिटिव्ह आली आहे. या प्रकरणी पीडित चिमुकलीच्या नातेवाईकांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. ब्लड बँका, आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजी पणाचा फटका त्या चिमुकल्या मुलीच्या आयुष्याला बसणार आहे. तसेच सध्याच्या महाभयंकर कोरोना काळात कुचकामी असलेल्या आरोग्य यंत्रणा आणखी किती जणांच्या आयुष्याशी खेळणार आहे, हा प्रश्न पीडितेचे नातवाईक आणि नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

चिमुकली झाली पॉझिटिव्ह
संक्रमित रक्त दिल्याने चिमुकली झाली hiv पॉझिटिव्ह

मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील एका महिलेला आठ महिण्याआधी एक गोंडस मुलगी झाली. तिसऱ्या दिवशी त्या चिमुकलीची प्रकृती खराब झाल्याने तिला मूर्तिजापूर येथील बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत अवघाते यांच्याकडे दाखल केले. मुलीची प्रकृती चिंताजनक होत असल्याने तिच्या विविध चाचण्या केल्यात. तिच्या रक्तातील पेशी कमी असल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी रक्ताच्या पेशी अकोला येथील बी. पी. ठाकरे ब्लड बँकेतून आणण्याचे सांगितले. त्यांनी सांगितल्या नुसार चिमुकलीच्या नातेवाईकांनी रक्तातील पेशी आणल्या. त्या पेशी डॉक्टरांनी त्या चिमुकलीला दिल्या.

नातेवाईकांची आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार

पालकांची चाचणी निगेटिव्ह-

परंतु, कालांतराने त्या चिमुकलीला ताप जास्त येत असल्याने तिला परत डॉ. अवघाते यांच्याकडे दाखल करण्यात आले. त्यांनी या चिमुकलीच्या चाचणीसाठी तिला अमरावती येथे पाठविले. तिच्या चाचण्या केल्यानंतर त्या चिमुकलीला एचआयव्ही असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. एचआयव्ही चाचणीमध्ये ती चिमुकली पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनी त्या चिमुकलीच्या आई व वडिलांची एचआयव्ही चाचणी केली. त्यामध्ये ते निगेटिव्ह आले.

चिमुकली झाली पॉझिटिव्ह
चिमुकली झाली पॉझिटिव्ह
डॉक्टरांनी त्या चिमुकलीला ब्लड दिले असल्याचे लक्षात आले. तेव्हा डॉक्टरांनी ठाकरे ब्लड बँकेशी संपर्क साधला. त्यांनी डोनर हे एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे चाचणीतून समोर आले. याप्रकरणी चिमुकलीच्या नातेवाईकांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशीची करण्यासह, यातील दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. ब्लड बँकेवर आरोग्य यंत्रणेचे नाही नियंत्रण-

राज्यातील अनेक ब्लड बँक या व्यवसाय करीत असल्याचा आरोप होत आहे. या ब्लड बँकेवर कोणत्याच आरोग्य यंत्रणांचे नियंत्रण नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्य कायद्याखाली आणि कोणत्या नियमात आजपर्यंत कारवाई झालेली नाही. परिणामी, या गोष्टीचा फायदा घेऊन ब्लड बँक या रुग्णांच्या आयुष्याशी खेळ खेळत असल्याचा आरोप होत आहे.

Last Updated : Sep 2, 2021, 12:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.