ETV Bharat / state

उपकेंद्र सहाय्यक पदासाठी मराठा समाजातील एसइबीसीच्या उमेदवारांवर अन्याय - सकल मराठा समाज - MSEB recruitment news

महावितरण विभागाने उपकेंद्र सहाय्यक पदासाठी घेतलेल्या भरती प्रकियेत मराठा समाजावर अन्याय झाल्याच्या भावना मराठा नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाने आज महावितरणच्या विद्युत भवनावर धरणे आंदोलन करून अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले. यावेळी महावितरण विरोधात नारेबाजी करण्यात आली.

maratha protest in akola
उपकेंद्र सहाय्यक पदासाठी मराठा समाजातील एसइबीसीच्या उमेदवारांवर अन्याय - सकल मराठा समाज
author img

By

Published : Dec 1, 2020, 10:25 PM IST

अकोला - महावितरण विभागाने उपकेंद्र सहाय्यक पदासाठी घेतलेल्या भरती प्रकियेत मराठा समाजावर अन्याय झाल्याच्या भावना मराठा नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाने आज महावितरणच्या विद्युत भवनावर धरणे आंदोलन करून अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले. यावेळी महावितरण विरोधात नारेबाजी करण्यात आली.

उपकेंद्र सहाय्यक पदासाठी मराठा समाजातील एसइबीसीच्या उमेदवारांवर अन्याय - सकल मराठा समाज

महावितरण विभागात उपकेंद्र सहाय्यक पदासाठी एसइबीसी प्रवर्गातून भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्या अनुषंगाने कागदपत्रांची तपासणी होत आहे. कागदपत्र पडताळणीतून मराठा समाजाच्या उमेदवारांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. हा मराठा समाजावर अन्याय आहे. एसइबीसी उमेदवाराची निवड झाल्यावर एक व दोन तारखेला पडताळणी पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली आहे.

या अन्यायाविरोधात मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा मोर्चामध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही चूक तत्काळ दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी करत मराठा क्रांती समाजातर्फे विद्युत भवनसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अशोक पटोकार, मनोज तायडे, कृष्णा अंधारे, डॉ. अभय पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.