अकोला - पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने तेल्हारा येथील ग्राम उकळी येथे दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 70 हजार 123 रुपयांच्या देशी दारुसह इतर मुद्देमाल जप्त केला गेला आहे. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली.
ही कारवाई जिल्हा परिषद निवडणूक दरम्यान होत असल्याने याला महत्त्व प्राप्त झाले आहे. पातुर्डा येथुन दोघे दुचाकीवर देशी दारू घेऊन जात असल्याची माहिती पोलीस अधिक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून ग्राम उकळी येथे सुमेध इंद्रभान तायडे, लक्ष्मण गुलाब अंभोरे यांना थांबवून त्यांची चौकशी केली गेली. यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या देशी दारुसह इतर साहित्य असा मिळून 70 हजार 123 मुद्देमाल मिळून आला. पथकाने मुद्देमाल जप्त करून या दोघांविरोधात तेल्हारा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.