ETV Bharat / state

अकोला जिल्ह्यात पहिल्या लाटेतच दहा टक्के मुलांना झाला कोरोना - अकोला कोरोना बाधितांची संख्या

अकोला जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. परंतु, या दुसऱ्या लाटेच्या आधीच पहिला लाटेमध्ये कोरोना रुग्णांच्या मध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत शून्य ते दहा वर्षे वयोगटातील लहान मुलांना लागण झालेली आहे. या वयोगटातील जवळपास 1148 म्हणजेच अडीच टक्के लहान मुलं कोरोना बाधित होऊन ते बरे होऊन घरी गेले आहे. तर अकरा ते वीस वर्षे वयोगटातील तीन हजार 489 म्हणजेच 7.7 टक्के मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत एकुण साडेचार हजारांपेक्षा जास्त मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

akola corona update
अकोला कोरोना
author img

By

Published : May 13, 2021, 10:03 AM IST

अकोला - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरी लाट सुरू झाली असली तरी या रुग्णांच्या संख्येत घट झाली नाही. परंतु, जिल्ह्यात पहिल्या लाटेपासूनच आतापर्यंत जवळपास पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी दहा टक्के मुलांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. या मुलांपैकी एकही रुग्ण दगावला नसल्याची माहितीही त्यांनी दिली.

जगभरामध्ये कोरोनाचा हाहाकार सुरू असताना दुसरी लाट संपत नाही तोच तिसऱ्या लाटेच्या संदर्भात जागतिक आरोग्य संस्थेने धोका दर्शविला आहे. या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे, आवाहन जागतिक आरोग्य संस्थेने सर्वच देशांना केले आहे.

अकोला जिल्ह्यात पहिल्या लाटेतच दहा टक्के मुलांना झाला कोरोना..

अकोला जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. परंतु, या दुसऱ्या लाटेच्या आधीच पहिला लाटेमध्ये कोरोना रुग्णांच्या मध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत शून्य ते दहा वर्षे वयोगटातील लहान मुलांना लागण झालेली आहे. या वयोगटातील जवळपास 1148 म्हणजेच अडीच टक्के लहान मुलं कोरोना बाधित होऊन ते बरे होऊन घरी गेले आहे. तर अकरा ते वीस वर्षे वयोगटातील तीन हजार 489 म्हणजेच 7.7 टक्के मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत एकुण साडेचार हजारांपेक्षा जास्त मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. ही संख्या पहिल्या लाटेपासूनच आहे, हे विशेष.

या बाधित लहान मुलांच्या संख्येमध्ये दुसऱ्या लाटेत वाढ होण्याची शक्यता असली तरी तिसऱ्या लाटेमध्ये ही संख्या वाढण्याची भीती आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्य संदर्भात दक्षता बाळगण्याचे, आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजकुमार चव्हाण यांनी केले आहे.

लहान मुलांना कोरोना होण्याची संभावित कारणे -
* बाहेर खेळणे
* एकमेकांच्या संपर्कात येणे
* मास्क न वापरणे
* सॅनिटायझर न वापरणे
* हाथ वारंवार न धुणे
* कुठेही स्पर्श करणे
* कुठेही फिरणे

कोरोनाची तिसरी लाट येईल, हे नक्की असलं तरी आताची दुसरी लाट गंभीर आहे. त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, त्यांना बाहेर पडू देऊ नये, असं आवाहन डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.