अकोला - दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरूवारी सायंकाळी हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली होती. मात्र, शेतकऱ्यांसाठी आता मोठा दिलासा मिळाला आहे.
सकाळपासून कडाक्याचे ऊन पडले होते. दुपारी ढगाळ वातावरण झाले होते. त्यानंतर प्रचंड उकाडा निर्माण झाल होता. अचानक आलेल्या धो धो पावसामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. पावसापासून बचाव करण्यासाठी लोकांची मोठी धावपळ पहायला मिळाले.