ETV Bharat / state

युवा शेतकऱ्याचा जुगाड; वन्यप्राण्यांना शेतातून हाकलण्यासाठी बनविली 'बंदूक' - gun made by a farmer

जिल्ह्यात शेतीपिकांमध्ये वन्यप्राण्यांचा धुडगूस वाढला आहे. यामुळे वन्य प्राण्यांचा त्रास रोखण्यसाठी शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब करून मोठा आवाज करणारी बंदूक बनविली आहे.

gun-made-by-young-farmer-to-escape-wild-animals
वन्यप्राण्यांना शेतातून हाकलण्यासाठी बनविली घरच्याघरी बंदूक
author img

By

Published : Jan 16, 2020, 8:29 AM IST

अकोला - जिल्ह्यात शेतीपिकांमध्ये वन्यप्राण्यांचा धुडगूस वाढला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा त्रास रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी जुगाड तंत्रज्ञानाचा अवलंब करून घरच्याघरी बंदूक बनविली आहे. या बंदुकीच्या आवाजाने वन्यप्राणी शेताबाहेर पळून जात असल्याचा अनुभव शेतकरी सांगताहेत.

वन्यप्राण्यांना शेतातून हाकलण्यासाठी बनविली घरच्याघरी बंदूक

सध्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड केली असून गहू, चना, तूर यासह कपाशी व फळबागांमध्ये वन्यप्राणी नासधूस करत आहेत. अस्वल, रानडुक्कर, वाघ, माकड या वन्यप्राण्यांकडून शेतकरी शेतमजुरांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळं शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना धोका तर आहेच शिवाय पिकांना वाचविण्याची देखील धडपड करावी लागत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी घरच्याघरी बंदूक बनविली असून या बंदुकीतील आवाजाच्या दहशतीने वन्यप्राण्यांनी शेताकडे फिरकने बंद केले आहे. यामुळे अकोल्यातील दहिगाव गावंडे येथील सचिन बडोदे या युवा शेतकऱ्याने वन्यप्राण्यांना पळविण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे.

एक अडीच इंची पीव्हीसी पाईपला समोर दीड इंचाचा दुसरा पाइप चिकटवला. त्याला एक लायटर लावून ही गावठी तोफ तयार केली. पाइपला एक छिद्र पाडून त्यात कॅल्शिअम कार्बोनेट चा एक छोटा तुकडा टाकला. त्यावर पाणी टाकून छिद्र बंद केल्यास आत गॅस तयार होते. त्यावेळी लायटर चा खटका दाबताच स्फोटासारखा जोरदार आवाज होतो. या आवाजानेच वन्यप्राणी पळून जातात, असा शेतकऱ्यांचा दावा आहे. या शेतकऱ्यांच्या शक्कली मुळे वन्यप्राणी शेतात कुठलेही नुकसान करत नाहीत.

Intro:अकोला -जिल्ह्यात शेतीपिकांमध्ये वन्यप्राण्यांचा धुडगूस वाढला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा हैदोस रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी जुगाड तंत्रज्ञानाचा अवलंब करून घरच्याघरी बंदूक बनविली असून बंदुकीतून आवाजाने वन्यप्राणी शेताबाहेर पळून जात असल्याचा अनुभव शेतकरी सांगताहेत.Body:सध्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड केली असून गहू, चणा, तूर यासह कपाशी व फळबागांमध्ये वन्यप्राणी नासधूस करीत आहेत. अस्वल, रानडुक्कर, वाघ, माकड ह्या वन्यप्राण्यांकडून शेतकरी शेतमजुरांवर हल्ल्याच्या देखील घटनांमध्ये वाढ झाली आहे., त्यामुळं शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना धोका तर आहेच शिवाय पिकांना वाचविण्याची देखील धडपड करावी लागत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी घरच्याघरी बंदूक बनविली असून ह्या बंदुकीतील आवाजाच्या दहशतीने वन्यप्राण्यांनी शेताकडे फिरकने बंद केले आहे. त्यामुळे अकोल्यातील दहिगाव गावंडे येथील सचिन बडोदे या युवा शेतकऱ्याने वन्यप्राण्यांना पळविण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. एक अडीच इंची पीव्हीसी पाईपला समोर दीड इंचाचा दुसरा पाइप चिपकवला. त्याला एक लायटर लावून ही गावठी तोफ तयार केली. पाइपला एक छिद्र पाडून त्यात कॅल्शिअम कार्बोनेट चा एक छोटा तुकडा टाकला., त्यावर पाणी टाकून छिद्र बंद केल्यास आत गॅस तयार होते. त्यावेळी लायटर चा खटका दाबताच स्फोटासारखा जोरदार आवाज होतो, ह्या आवाजानेच वन्यप्राणी पळून जातात, असा शेतकऱ्यांचा दावा आहे. या शक्कल मुळे वन्यप्राणी शेतातून कुठलेही नुकसान करीत नाही.

बाईट :- सचिन बडोदे
शेतकरी, दहीगांव गावंडे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.