ETV Bharat / state

अकोला : पालकमंत्र्यांनी केली कोरोना प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी, नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन - bacchu kadu in akola

राज्याचे कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी गरुवारी कोरोना प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच विविध गोष्टींचा आढावा घेत आवश्यक उपाययोजा करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

पालकमंत्री कडू कोरोना प्रतिबंधित क्षेत्राची केली पाहणी

author img

By

Published : May 14, 2020, 2:41 PM IST

Updated : May 14, 2020, 3:51 PM IST

अकोला - कोरोना संसर्गाच्या सर्वाधिक प्रादुर्भावाचे केंद्र ठरलेल्या महापालिका हद्दीतील विविध प्रतिबंधित क्षेत्रांची गुरुवारी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी पाहणी केली.

पालकमंत्र्यांनी केली कोरोना प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

आजच्या(गुरुवार) भेटीत कडू यांनी बैदपुरा. माळीपुरा, खैर मोहम्मद प्लॉट, कृषीनगर, न्यू भीमनगर आदी भागांची पाहणी केली. या भागातील झालेले आरोग्य सर्वेक्षण, प्रत्यक्ष रुग्णाचे घर व त्यांच्या संपर्कातील लोक यांचा संपर्क शोधून त्यांच्या आरोग्य तपासणीसाठीची यंत्रणा त्यांनी समजावून घेतली. या यंत्रणेने संपर्क शोधून अधिकाधिक संदिग्ध रुग्ण शोधून चाचण्या करुन घ्याव्यात अशा सुचनाही त्यांनी केल्या.

यावेळी प्रतिबंधित क्षेत्राचा नाकेबंदी केलेला भाग, तेथील सार्वजनिक स्वच्छता, अन्य नागरी सुविधा तसेच नागरिकांना येणाऱ्या अन्य अडचणी व त्यांचे अन्य प्रश्न याबाबत त्यांनी विचारपूस केली. नागरिकांनी घरातच थांबावे असे आवाहनही केले. याभागातील नागरिकांना कोणत्याही कारणासाठी बाहेर पडावे लागू नये, यासाठी त्यांना जास्तीत जास्त सुविधा घरपोच देण्याबाबत त्यांनी सुचना केली. स्थानिक स्वस्त धान्य दुकानदारांच्या वतीने शिधापत्रिकाधारकांना घरपोच धान्य द्यावे, अशीही त्यांनी सुचना केली. न्यू भीमनगर भागात ज्या कुटूंबांना जेवणाची सोय नसेल त्यांच्यासाठी तेथे शिवभोजन थाळी केंद्र सुरू करावे असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

Last Updated : May 14, 2020, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.