ETV Bharat / state

MP Bhavna Gawli : खासदार गवळींविरोधातील नारेबाजी प्रकरण : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे नोंदविले जबाब - sloganeering against MP Bhavna Gawli

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार गवळी (MP Bhavna Gawli) यांच्या विरोधात 22 नोव्हेंबर रोजी अकोला येथे नारेबाजी (sloganeering against MP Bhavna Gawli) केली. शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी या रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. दरम्यान शिवसेना गटाकडून 'गद्दार' आणि 'पन्नास खोके' एकदम ओके' अशा घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले. या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावून (Notice to Shiv Sena office bearers) आज बयान नोंदविण्यासाठी (Latest news from Akola) बोलावले होते.

Sloganeering Against MP Bhavna Gawli
खा. भावना गवळी यांच्या विरुद्ध घोषषाबाजी करणारे
author img

By

Published : Dec 4, 2022, 5:42 PM IST

अकोला: खासदार भावना गवळी (MP Bhavna Gawli) या अकोला रेल्वे स्थानक येथे 22 नोव्हेंबर रोजी आले असता त्यावेळी खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांच्यासोबत आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार गवळी यांच्या विरोधात नारेबाजी (sloganeering against MP Bhavna Gawli) केली. या प्रकरणानंतर खासदार गवळी यांनी अकोला लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी यामध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल करीत यातील पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावून (Notice to Shiv Sena office bearers) आज बयान नोंदविण्यासाठी बोलावले होते. जवळपास दोन ते तीन तास चाललेल्या या चौकशीमध्ये पोलिसांनी पदाधिकाऱ्यांचे बयान नोंदविले. (Latest news from Akola)

खा. भावना गवळी यांच्या विरुद्ध घोषषाबाजी

'गद्दार' आणि 'पन्नास खोके' एकदम ओके'च्या घोषणा : खासदार विनायक राऊत हे 22 नोव्हेंबर रोजी अकोला दौऱ्यावर होते. त्यांचा दौरा आटोपल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी खासदार राऊत यांना निरोप देण्यासाठी अकोला रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती. त्याच दरम्यान शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी या रेल्वे स्थानकावर आल्या. त्या रेल्वेमध्ये जात असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार गवळी यांना पाहून नारेबाजी केली. 'गद्दार' आणि 'पन्नास खोके' एकदम ओके' अशा घोषणा दिल्या.

विविध कलमान्वये गुन्हे दाखल : या प्रकारानंतर खासदार गवळी यांनी अकोला लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी यामध्ये खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यासह दिलीप बोचे, पूर्व शहर प्रमुख अतुल पवणीकर, गजानन बोराळे, राहुल कराळे, राम गावंडे, प्रदीप गुरूगुद्दे व इतर यांच्या विरोधात भा. दं. वी. 143, 294, 500, 509, 504, 506 या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. या प्रकरणाच्या संदर्भामध्ये जीआरपी पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावून चार डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात बयान नोंदविण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार हे पदाधिकारी पोलिस ठाण्यात हजर झाले. जवळपास दोन ते तीन तास पोलिसांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे बयान नोंदविले.

खासदार राऊत आणि आमदार देशमुख अनुपस्थित : दरम्यान, या प्रकरणांमध्ये खासदार विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांचेही नाव असल्याने त्यांना नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र, हे दोन्ही लोकप्रतिनिधी बयान नोंदविण्यासाठी अनुपस्थित होते. या दोन्ही लोकप्रतिनिधींचे बयान नोंदविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

खासदार भावना गवळी यांनाही नोटीस : दरम्यान, खासदार भावना गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचाही जबाब नोंदविण्यासाठी जीआरपी पोलिसांनी कलम 160 अन्वये नोटीस बजावली असल्याची माहिती आहे. त्यामुळे खासदार गवळी या पोलीस स्टेशन येथे येऊन आपले म्हणणे पोलिसांसमोर मांडावे लागणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्यांना देण्यात आलेल्या नोटिसमध्ये वेळ व तारीख देण्यात आली नसून लवकरात लवकर येण्याचे कळविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.