ETV Bharat / state

मेड इन अकोला : खराब अन्नापासून बनविला घरगुती गॅस - food

अकोल्यातील तोष्णीवाल कुंटुंबाने खराब अन्नापासून बनविला घरगुती गॅस बनवला आहे. वर्षभरात त्यांना फक्त दोन वेळा बाहेरून गॅस सिलिंडर विकत आणावा लागतो.

अकोल्यातील तोष्णीवाल कुंटुंबाने खराब अन्नापासून बनविला घरगुती गॅस बनवला आहे.
author img

By

Published : May 8, 2019, 11:23 AM IST

अकोला - खराब, शिळे झालेले अन्न आणि पालेभाज्यांपासून घरगुती गॅस तयार करता येऊ शकतो, यावर आपला विश्वास बसणार नाही. परंतु, अकोल्यातील तोष्णीवाल कुटुंबाने ही किमया केली असून गेल्या दहा वर्षांपासून ते घरगुती गॅस वापरत आहेत. त्यामुळे त्यांना वर्षातून केवळ दोनच सिलिंडर बाहेरून विकत घ्यावे लागतात. परिणामी सिलिंडरची दरवाढ झाली काय आणि न झाली काय? याचा त्यांना काहीच फरक पडत नाही.

'वेस्टपासून बेस्ट' फार्मूला तयार करण्यात तोष्णीवाल कुटुंब अग्रस्थानावर आहे. तोष्णीवाल कुटुंबीयांचा गॅस निर्मितीचा हा प्रयोग अनेकांनी बघितला आहे. बऱ्याच ठिकाणी या प्रयोगाचा वापरही सुरू झाला आहे. सिलिंडरची दरवाढ ही आपल्या घराचे आर्थिक बजेट बिघडवत असते. वेळेवर न मिळणारे सिलिंडर हे नेहमीच डोकेदुखी ठरत असते. ऑनलाइन सिलिंडर पद्धती जरी झाली असली तरी ती अद्यापही यशस्वी झाल्याची दिसून येत नाही. या सर्व अडचणींमुळे इच्छा नसतानाही आपल्याला सिलिंडरवर अवलंबून राहावे लागते. आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेल्या सिलिंडरचा आपण पीच्छा सोडू शकत नसल्यासारखी परिस्थिती आहे.

अकोल्यातील तोष्णीवाल कुंटुंबाने खराब अन्नापासून बनविला घरगुती गॅस बनवला आहे.

या सर्व डोकेदुखीवर तोष्णीवाल लेआउटमध्ये राहणारे अशोक तोष्णीवाल यांच्या कुटुंबाने उपाय शोधला आहे. घरातील शिळे, खरकटे अन्न आणि पालेभाज्या, फळे यांची टरफल वापरून गॅस तयार करण्याची किमया या कुटुंबाने शोधून काढली आहे. त्यांचा हा प्रयोग ते स्वतः गेल्या दहा वर्षांपासून घरी उपयोगात आणत आहेत. ज्याप्रमाणे आपण सिलिंडर घरी आणून नियमित आवश्यक ते अन्न शिजवतो. तसेच अन्न या घरगुती गॅसवर ते सहज आणि त्याच पद्धतीने शिजवतात. त्यामुळे दर महिन्यातील गॅसची बचत ते करीत आहेत. वर्षभरात त्यांना फक्त दोन वेळा बाहेरून गॅस सिलिंडर विकत आणावा लागतो.

घरगुती गॅस तयार करण्यासाठी त्यांनी छतावर दोन मोठ्या पाण्याच्या प्लास्टिकच्या टाक्या उभारून त्यात गॅस तयार करता येईल, अशा पद्धतीने काही साहित्यांची उभारणी केली. हे साहित्यही फार महागडे किंवा दुर्मिळ नसून सहज उपलब्ध होतील अशा या साहित्य मधून हा गॅस तयार झाला आहे. हा गॅस घरगुती पदार्थ शिजवण्यासाठी उपयोगी येऊ शकतो. सिलिंडर गॅसप्रमाणेच या गॅसचीही ज्वाला राहते. यासाठी आपल्याकडे असलेले शिळे, खरकटे अन्न तसेच फळ भाज्या यांची टरफलही आपण उपयोगात आणू शकतो. यासाठी फार मोठा खर्च आपल्याला लागत नाही अवघ्या पंधरा ते वीस हजार रुपयात घरातच गॅस सिलिंडर बनविण्याचा घरगुती कारखाना तयार होऊ शकतो.

Intro:अकोला - खराब, शिळे अन्न आणि पालेभाज्यांच्या टरफलांपासून घरगुती गॅस बनू शकतो, यावर आपला विश्वास बसणार नाही. परंतु, येथील एका कुटुंबाने ही किमया केली असून गेल्या दहा वर्षांपासून ते घरगुती गॅस वापरत आहे. त्यांचा दर महिन्याचा सिलेंडर खरेदीचा खर्च वर्षातून दोन वेळा होत आहे. त्यांना सिलेंडरचे दरवाढ झाली काय आणि न झाली काय याचा काहीच फरक पडत नाही. 'वेस्ट पासून बेस्ट' फार्मूला तयार करण्यात तोष्णीवाल कुटुंब अग्रस्थानावर आहे. त्यांचा हा प्रयोग अनेकांनी बघितला आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांनी ही संकल्पना रुजविली आहे. त्या कुटुंबाचीही वारंवार सिलेंडर खरेदीची कटकट कमी झाली आहे.

Body:सिलेंडरची दरवाढ ही आपल्या घराचे आर्थिक बजेट बिघडवत असते. वेळेवर न मिळणारे सिलेंडर हे नेहमीच डोकेदुखी ठरत असते. ऑनलाइन सिलेंडर पद्धती जरी झाली असली तरी ती अद्यापही यशस्वी झाल्याची दिसून येत नाही. दर महिन्यात सिलेंडर संपण्याआधी नवीन सिलेंडरची खरेदीची कटकट ही प्रत्येक कुटुंबाला घरी सिलेंडर येईपर्यंत सोसावी लागते. या सर्व अडचणींमुळे इच्छा नसतानाही आपल्याला सिलेंडर वर अवलंबून राहावे लागते. आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेल्या सिलेंडरचा आपण पीच्छा सोडू शकत नसल्यासारखी परिस्थिती आहे.
या सर्व डोकेदुखी वर येथील तोष्णीवाल लेआउटमध्ये राहणारे अशोक तोष्णीवाल त्यांच्या कुटुंबाने उपाय शोधला आहे. घरातील शिळे, खरकटे अन्न आणि पालेभाज्या, फळं यांचे टरफल वापरून गॅस तयार करण्याची किमया या कुटुंबाने शोधून काढली आहे. त्यांचा हा प्रयोग ते स्वतः गेल्या दहा वर्षांपासून घरी उपयोगात आणत आहेत. शिळ्या अन्नापासून तयार झालेला हा गॅस त्यांच्या आर्थिक बजेटला दर महिन्यात वाढवीत आहे. ज्याप्रमाणे आपण सिलेंडर घरी आणून नियमित आवश्यक ते अन्न शिजवतो. तसेच अन्न या घरगुती गॅस वर ते सहज आणि त्याच पद्धतीने शिजवतात. त्यामुळे दर महिन्यातील गॅसची बचत ते करीत आहेत वर्षभरात त्यांना फक्त दोन वेळा बाहेरून गॅस सिलेंडर विकत आणावा लागतो.
घरगुती गॅस तयार करण्यासाठी त्यांनी छतावर दोन मोठ्या पाण्याच्या प्लास्टिकच्या टाक्या उभारून त्यात गॅस तयार करता येईल अशा पद्धतीने काही साहित्यांची उभारणी केली. हे साहित्यही फार महागडे किंवा दुर्मिळ आहेत असं नाही तर सहज उपलब्ध होतील अशा या साहित्य मधून हा गॅस तयार झाला आहे. हा गॅस घरगुती पदार्थ शिजवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. ज्याप्रमाणे आपण सिलेंडर गॅसमधून अग्नि बघतो त्याच प्रकारची अग्नी या गॅसमधून निघते. ही अग्नी निर्माण करण्यासाठी आपल्याकडे असलेले शिळे आणि खरकटे यांना तसेच फळ भाज्या यांची तर फलही आपण उपयोगात आणू शकतो. यासाठी फार मोठा खर्च आपल्याला लागत नाही अवघ्या पंधरा ते वीस हजार रुपयात घरातच गॅस सिलेंडर बनविण्याचा घरगुती कारखाना तयार होऊ शकतो.

Conclusion:सूचना - बायोगॅसची पॅकेज स्टोरी आहे, त्यात आधी संदीप तोष्णीवाल यांचा त्यानंतर त्यांच्या आईचा बाईट आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.