अकोला - तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्र चालकाने शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बियाण्यांचे पोते विकताना पोत्यांवर 'सदर बियाणे हे मी माझ्या जबाबदारीवर नेत आहे, तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईल', असे अनधिकृत शिक्के मारले होते. हे वृत्त 'ईटीव्ही भारत' ने 3 जून रोजी प्रकाशित केले होते. या प्रकरणी कृषी अधीक्षक यांनी सुनावणी देत गणेश कृषी सेवा केंद्र, हे निलंबित केल्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - आशा स्वयंसेविकांचे स्थानिक प्रशासनाच्या विरोधात निदर्शने
सदर प्रकारणाचे वृत्त ईटीव्ही भारतने दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. कांताप्पा खोत यांनी चौकशीचे आदेश देऊन 14 जून रोजी त्यांच्याकडे सुनावणी ठेवली. या सूनवणीनंतर कृषी अधीक्षक यांनी गणेश कृषी सेवा केंद्र हे निलंबित केल्याचे आदेश दिले. यासोबतच इतरही तीन कृषी सेवा केंद्रांवर निलंबन आणि एका केंद्राचा परवाना रद्द केला आहे.
'ईटीव्ही भारत'च्या वृत्ताची दखल
कृषी सेवा केंद्र चालक अशाप्रकारे शिक्के मारून शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा प्रकार यामधून दिसून येत होते. दरम्यान, या संदर्भामध्ये 'ईटीव्ही भारत'ने 3 जून रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. कांताप्पा खोत यांनी या वृत्ताची दखल घेवून याप्रकरणी तेल्हारा तालुका कृषी अधिकारी यांना चौकशीचे आदेश 4 जून रोजी दिले. तसेच, यातील चौकशी अहवाल आणि संबंधित कृषी केंद्र संचालक याची 14 जून रोजी त्यांच्या समक्ष सुनावणी ठेवली. या सुनवणीनंतर जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. कांताप्पा खोत यांनी तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्राला दोषी ठरविले. तसेच, हे कृषी सेवा केंद्र महिन्याभरासाठी निलंबित केले. यासोबतच बियाण्यांची लिंचिंग केल्याप्रकरणी तेल्हारा येथील कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कानशिवणी येथील कृषी सेवा केंद्र निलंबित केले आहे. यासोबतच इतरही ठिकाणचे दोन कृषी सेवा केंद्र निलंबित केले आहे.
हेही वाचा - अकोट येथे वादळी पावसामुळे केळीसह अन्य पिकांचे मोठे नुकसान