अकोला - जिल्ह्यामध्ये उन्हाळी भुईमूग हा पहाड पट्टी भागात घेतल्या जातो. यावर्षी पाण्याची मुबलकता, जमिनीची सुपीकता चांगली असल्यामुळे बागायती पिके शेतकऱ्यांनी घेतली. मात्र, निसर्गाच्या अवकृपेने व वातावरणातील बदलामुळे अनेक पिकांना फटका बसला आहे. उन्हाच्या तडाख्याने टरबूज उत्पादकांना चांगले आर्थिक नुकसान झाले. त्यातच आता भुईमूगावर बुरशी आल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.
अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी यासारख्या तालुक्यातील बागायती शेतकऱ्यांचे या बुरशीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना फारसे उत्पन्न मिळू शकले नाही. पातुर तालुक्यातील बाभूळगाव आणि अकोट तालुक्यातील बोर्डी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील भुईमूगावर बुरशी आल्यामुळे त्यांचे उत्पन्न घटले आहे.
खर्च निघण्याएवढेच उत्पन्न होणार -
कधी चक्रीवादळ, कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस तर कधी जास्त तापमानाचा सामना शेतकर्यांना करावा लागतो. यामुळे उत्पन्नात घट होते. तर शासनाकडून मदतीची अपेक्षा राहते. एवढ्या संकटाचा सामना करून सुद्धा शेतकऱ्यांनी काळ्यामातीत आपला घाम गाळून भुईमूग पिकाचे उत्पन्न घेण्याची हिम्मत दाखविली. मात्र, यावर्षी सतत ढगाळ वातावरण, अवेळी पाऊस यामुळे भुईमूग उत्पादक शेतकरी पूर्णपणे तुटला आहे. यावर्षी भुईमूग पिकामध्ये बुरशी आल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. खर्च निघेल एवढेच उत्पन्न यावर्षी शेतकऱ्यांना भुईमुंग पिकातून होण्याची शक्यता भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - शेतात मंदिर बांधू दिले नाही म्हणून पोलीस पाटील कुटुंबावर ग्रामस्थांचा बहिष्कार
शेतात डौलाने उभा असलेला भूईमूग हिरवागार दुरून दिसत असला तरी जवळ गेल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात वाळलेला दिसत आहे. या बुरशीमुळे शेतकऱ्यांना भुईमुगाचा दानाही चांगला निघत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. बुर्शीवर उपाय करूनही शेतकऱ्यांना त्यामध्ये यश आले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पातुर तालुक्यातील बाभूळगाव या गावातील राजेश महाणकर आणि पंकज गायकवाड या दोन शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये भुईमूग पिकाचे उत्पन्न घेतले.
राजेश महानकर यांना दरवर्षी एकरी सात ते आठ क्विंटल भुईमूग होत असे. एवढ्या उत्पन्नावर पंकज गायकवाड हे पण समाधानी असत. मात्र, यावर्षी त्यांच्या शेतातील भुईमूगवर मोठ्या प्रमाणात बुरशी आल्यामुळे त्यांचे उत्पन्न घटले आहे. एकरी अंदाजे चाळीस हजार रुपये खर्च त्यांना आलेला आहे. मात्र, या बुरशीमुळे आता हे उत्पन्न एकरी एक ते दीड क्विंटलवर आले असल्याने त्यांचे खर्च वजा जाता दमडीही हातात राहणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गाने झोडपले असले तरी शासनाने मात्र या भुईमुगाच्या नुकसानीत ऊन मदतीने शेतकऱ्यांना वाटते आणावे, अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - कृषी सेवा केंद्र सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत राहाणार सुरु