ETV Bharat / state

अखेर 'त्यांची' आई आलीच नाही; सापडलेली बिबट्याची चारही पिले गोरेवाडा प्रकल्पाकडे हस्तांतरीत - पातूर वनपरिक्षेत्र बिबट्या पिले

३० जूनला मौजे पास्टूलजवळ मोर्णा नदीच्या पात्रात बिबट्याची तीन पिले सापडली. दुसऱ्या दिवशी आणखी एक पिलू सापडले. या चार पिलांमध्ये दोन नर जातीची तर दोन मादी जातीची पिलांचा समावेश आहे. 15 दिवस या पिलांच्या आईची वाट बघण्यात आली मात्र, ती आली नाही. त्यामुळे ही चारही पिले गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रकल्पाकडे हस्तांतरीत करण्यात आली.

Leopard Cubs
बिबट्याची पिले
author img

By

Published : Jul 16, 2020, 3:25 PM IST

अकोला - पातूर वनपरिक्षेत्रातील मौजे पास्टूल येथे १५ दिवसांपूर्वी बिबट्याची दोन मादी आणि दोन नर अशी एकूण चार पिले सापडली. इतके दिवस वाट पाहूनही त्यांची आई अर्थात मादी बिबट पिलांच्या शोधात आली नाही. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १५ दिवस या चारही पिलांना बकरीचे दूध पाजून त्यांचे संगोपन केले. ही पिले आज गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रकल्पाकडे हस्तांतरीत करण्यात आली, अशी माहिती उपवनसंरक्षक वि. ग. माने यांनी दिली.

३० जूनला मौजे पास्टूलजवळ मोर्णा नदीच्या पात्रात बिबट्याची तीन पिले सापडली. दुसऱ्या दिवशी आणखी एक पिलू सापडले. तेथील नागरिकांनी पातूर वन परीक्षेत्रातील खानापूर भाग-२मधील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यावेळी या पिलांचे वय तीन आठवडे होते. त्यांची आई जवळपासच असावी आणि ती पिलांच्या शोधात येईल, या आशेने मादी बिबट्याची वाट पाहण्यात आली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिलांना जंगलातच मात्र, एका सुरक्षित स्थळी आणून ठेवले. उपवनसंरक्षक वि. ग. माने यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी धीरज मदने, प्रशिक्षणार्थी अधिकारी कुंडलिक होटे आणि सहायक वनसंरक्षक नितीन गोंडवणे यांनी या पिलांची जबाबदारी घेतली.

या पिलांची दररोज निगा राखण्याचे आणि त्यांच्या आईचा शोध घेण्याचे काम सुरू केले. वन विभागाने या पिलांना मुद्दाम उघड्यावर परंतु सुरक्षित जागी ठेवले, जेणे करुन त्यांची आई त्यांना शोधत यावी. पिले ठेवलेल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, ट्रॅप कॅमेरे, नाईट व्हिजन कॅमेरे लावून पिलांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली. सर्वात मोठा प्रश्न या पिलांच्या खाद्याचा होता. वन्यजीव विभागातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली या पिलांना बकरीचे दूध पाजण्यात आले. ६० टक्के दूध आणि ४० टक्के पाणी या प्रमाणात दिवसातून तीन वेळा दे दूध पिलांना दिले गेले. पिलांच्या हाताळणीसाठी प्लास्टिकच्या बास्केटचा वापर करण्यात आला.

दरम्यान, या पिलांचे काय करायचे? यासाठी उपवनसंरक्षक माने हे सतत वन्यजीव विभागाच्या संपर्कात राहून मार्गदर्शन घेत होते. १५ दिवस वाट पाहूनही या पिलांची आई आली नाही, म्हणून त्यांना गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रकल्पात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपूरचे मुख्य वन्यजीव रक्षक यांच्याशी पत्रव्यवहार करूनच हा निर्णय घेण्यात आला. मुख्य वन्यजीव रक्षकांची परवानगी मिळाल्याने आज ही चारही पिले नागपूरकडे रवाना करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.