अकोला - खडकीत असलेल्या शासकीय जागृती महिला राज्यगृहातून शुक्रवारी सहा मुली पळून गेल्या होत्या. त्यापैकी चार मुलींना पकडण्यात खदान पोलिसांना यश आले आहे, तर इतर दोघींचा शोध सुरू आहे.
खडकी येथे असलेल्या शासकीय जागृती महिला राज्यगृहात 35 मुली राहतात. त्यापैकी सहा मुलींनी इमारतीच्या छतावर जाऊन ग्रीलला साडी बांधून त्याद्वारे त्या खाली उतरल्या. हा प्रकार तिथे असलेल्या काळजीवाहक आर. आर. गोटे यांना कळताच त्यांनी याबाबत खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी मिसिंगची नोंद घेतल्यानंतर पोलिसांनी मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. सहा पैकी चार मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर, इतर दोन मुलींचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक डी. सी. खंडेराव यांनी दिली.