अकोला- जिल्हा प्रशासनाकडे आज सकाळी आलेल्या 180 अहवालांमध्ये 48 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. या नव्या अहवालामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1240 वर पोहोचली आहे.
48 जणांमध्ये 22 महिला व 26 पुरुष आहेत. त्यात बाळापूर येथील आठ, अकोट फाईल, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, गुलजारपुरा येथील चार, गंगानगर व पिंपळखुटा येथील प्रत्येकी तीन, शंकरनगर, शिवसेना वसाहत व पातुर येथील प्रत्येकी दोन, कमला नेहरू नगर, सोळासे प्लॉट, खदान, कळंबेश्वर, बार्शीटाकळी, शिवनी, अकोट, दुर्गा नगर, तारफैल, महाकाली नगर, गांधी नगर, सोनटक्के प्लॉट, गीता नगर, भगतवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यातील तेरा अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केंद्रावरील आहेत.
प्रशासनाला आज मिळालेल्या 180 अहवालापैकी 132 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1240 वर पोहोचली असून 762 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील मृतांची संख्या 66 वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 412 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
प्राप्त अहवाल- १८०
पॉझिटिव्ह- ४८
निगेटिव्ह- १३२
जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- १२४०
मृत - ६६ (६५+१)
डिस्चार्ज- ७६२
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - ४१२